Bigg Boss OTT 3: बिग बॉसच्या घरात दिल्लीच्या हॉट ‘वडा पाव गर्ल’ ची एन्ट्री

वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिऑलिटी शो बिग बॉस ओटीटी सिजन 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसऱया सीजनच्या सूत्रसंचालनाची धुरा करण जोहर किंवा सलमान खान नव्हे तर बॉलीवूडचे झक्कास अभिनेते अनिल कपूर यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. मात्र कोणत्याही स्पर्धकाची माहिती निर्मात्यांनी दिली नसल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता निर्मात्यांनी बिग बॉस ओटीटी सिजन 3 च्या पहिल्या स्पर्धकाची घोषणा केली आहे.

दिल्लीची ‘वडापाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रिका दीक्षितला बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनची पहिली कन्फर्म स्पर्धक म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासंदर्भात Jio Cinema च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करण्यात आले आहे. चंद्रिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे वादग्रस्त व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. दिल्लीची वडा पाव गर्ल ते थेट प्रसिद्ध रियालिटी शो हा प्रवास कसा पूर्ण होईल हे पाहावे लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

कोण आहे चंद्रिका दीक्षित?
चंद्रिका दीक्षित ही दिल्लीची रहिवाशी आहे. चंद्रिकाने यापूर्वी हल्दीराम या कंपनीमध्ये काम केले होते. तिचा नवरा रॅपिडोमध्ये नोकरी करायचा. मात्र काही कारणांमुळे चंद्रिका यांनी हल्दीराम कंपनीतील नोकरी सोडली. यानंतर तिने सैनिक बिहार, दिल्ली येथे वडा पावची गाडी लावायला सुरूवात केली. यादरम्यान एका फूड ब्लॉगरने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे ती प्रचंड व्हायरल झाली.

चंद्रिका व्यतिरिक्त, बिग बॉस OTT 3 मध्ये दिसणाऱ्या स्पर्धकांची यादी देखील समोर आली आहे, ज्यात सोनम खान, सोना मकबूल, सना सुलतान, ‘टेम्पटेशन आयलंड’ चेष्टा भगत आणि निखिल मेहता, प्रभावशाली विशाल पांडे , पौलमी दास, गायक मिका सिंग आणि साई केतन राव यांचा समावेश आहे.