हरमनप्रीतला बिग बॅशमध्ये किंमतच नाही

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश लीगमध्ये कुणीही करारबद्ध केले नाही. हरमनप्रीतचा जुना संघ मेलबर्न रेनेगेड्सला तिला खरेदी करण्याची संधी होती, मात्र त्यांनी तिची खरेदी करणे टाळले. हरमनप्रीतला बिग बॅशमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त जात असले तरी यंदा प्रथमच जेमिमाह रॉड्रिग्जसह सहा महिला खेळाडू खेळताना दिसतील. रॉड्रिग्ज ही ब्रिस्बेन हिटमध्ये खेळताना दिसेल तर दीप्ती शर्माला मेलबर्न स्टार्सने करारबद्ध केलेय. विशेष म्हणजे या दोघींना प्लॅटिनम फेरीतच खरेदी करण्यात आले. दुसऱया फेरीत शिखा पांडेला(ब्रिस्बेन हीट) 15 व्या खेळाडूच्या रूपाने घेण्यात आले.  तिसऱया फेरीत पर्थ स्काॅचर्सने दयालन हेमलताला आपल्या संघात घेतले तर यास्तिका भाटियावर मेलबर्न स्टार्सने आपले नाव कोरले. तसेच स्मृती मानधना अॅडलेड स्ट्रायकर्ससाठी खेळताना दिसेल. याआधीच्या तिन्ही लीगमध्ये मानधना ब्रिस्बेन हिट, सिडनी थंडर आणि होबार्ट्स हरिकेन्सकडून खेळली होती. आता ही तिची चौथी टीम असेल. हे पहिलेच असे मोसम असेल ज्यात हिंदुस्थानच्या सहा महिला खेळाडू आपली फटकेबाजी दाखवतील.