मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे लाडक्या बहिणींची पाठ

विधानसभा निवडणुकीचा प्रचार हळूहळू वेग धरू लागला आहे. भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खेकडाफेम आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ आज परंडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी यावेळी सभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानादेखील मैदानाचा बराच मोठा भाग हा रिकामा असल्याने लाडक्या बहिणी या निवडणुकीत लाडक्या भावला कात्रजचा घाट दाखविणार की काय? अशी चर्चा सुरू आहे.