मिंधे गटाच्या पहिल्याच सभेची सुरुवात आयटम सॉँगने झाली. शिंदे गटाचे कुर्ल्यातील आमदार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू होण्यापूर्वी आयटम सॉँग सुरू झाले. तेदेखील भोजपुरी भाषेत. या गाण्यावर ठेका धरणाऱया मुलीसोबत सभेला उपस्थित असलेल्या तरुणांनीही नाचण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रचारसभेत उपस्थित असलेल्या महिला, मुलींनी प्रचंड संताप व्यक्त केला.
View this post on Instagram
कुर्ल्यातील या प्रचार सभेत झालेल्या आयटम सॉँगची चर्चा आता राज्यभरात रंगली आहे. प्रचारसभेत अशाप्रकारे आयटम सॉँग वाजवण्यात आल्याने नेटकऱयांकडूनही शिंदे गटावर टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्राची संस्कृतीच लोप पावत चालली आहे, निवडणुकीचे कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नाही, अशी टीकाही अनेकांनी केली. प्रचारसभेत अनेक महिलाही होत्या. त्यामुळे महिलावर्गातही याप्रकरणी संताप व्यक्त होत असल्याची माहिती आहे.