भाजपचा ‘खेल खतम’!

प्रसिद्धीची हाव असणाऱया भाजपच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम उपनगरामध्ये आमदार अॅड. आशीष शेलार यांचे अभिनंदन करताना भाजप तेरा खेल खतमअसा संदेश दिल्याने हे होर्डिंग चर्चेचा विषय ठरले आहे. त्याचे झाले असे की, आमदार शेलार यांना उत्कृष्ट संसदपटूम्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे होर्डिंग बेस्टस्टॉपवर मूळ होर्डिंगवर परस्पररीत्या  लावण्यात आले. मात्र बस स्टॉपवरील मूळ डिजिटल होर्डिंग सायंकाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या जाहिरातीलमधील अब तेरा खेल खतमअसा संदेश ठळकपणे दिसत आहे.