रेल्वेचे डबे घेऊन जाणाऱया ट्रकचे दोन तुकडे

भागलपूरमध्ये एक ट्रक रेल्वेचे डबे घेऊन जात होता. या वेळी ट्रक एका पुलाच्या रेलिंगला धडकून मोठा अपघात झाल्याची घटना घडली. यात ट्रकचा पुढील भाग तुटून एका बाजूला पडला. उल्टा पुलाजवळ ही घटना घडली. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. घटना घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. घटनेचे वृत्त कळताच रेल्वे अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी अनेकांनी या घटनेचा व्हिडीयो मोबाईल कॅमेऱयात कैद केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.