शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर खासगी क्लास चालक वठणीवर! ग्राहकाला आगाऊ फीचे पैसे केले परत

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर खासगी क्लास चालक वठणीवर आला असून त्याने अंधेरीतील वैद्य कुटुंबीयांकडून घेतलेली क्लासची आगाऊ फी त्यांना परत केली आहे.

चांगले शिक्षण मिळावे यासाठी अंधेरीतील वैद्य यांनी आपल्या नववीत शिकणाऱया मुलाचे लक्ष्य अपॅडमीमध्ये अॅडमिशन घेतले. क्लास चालकाने त्यांच्याकडून नववी आणि दहावीची एकत्र फी आकारली. नववीमध्ये योग्य शिक्षक नसल्याने वैद्य यांनी मुलाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दहावीसाठी मुलाचा क्लास बदलण्याचा विचार केला. परंतु दहावीची फी आगाऊ घेतली असल्याने क्लासेसने ती फी परत करण्यास नकार दिला. पालकांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱयांशी संपर्प साधून झालेला प्रकार कळवला. त्यानंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी यांनी लक्ष्य अपॅडमीच्या व्यवस्थापनाशी बैठक घेऊन पालकांनी भरलेल्या रकमेचे 50 टक्के रक्कम परत करण्यास क्लासेसला भाग पाडले.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर क्लास चालक वठणीवर आला असून त्याने पालकांना आगाऊ फीचे 105000 रुपये परत केले.

पालकांनी मानले शिवसेनेचे आभार

रखडलेली फी मिळवून दिल्याबद्दल वैद्य यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे आभार मानले व तसे आभार पत्र शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्याकडे शिवसेना भवन येथे सुपूर्द केले. तक्रार निवारणासाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे लोकसभा समन्वयक संजय पावले, कक्ष विधानसभा संघटक कृष्णकांत शिंदे, विक्रम शहा, रमेश मालवणकर, शारदा घुले, तृप्ती सावंत या पदाधिकाऱयांनी प्रयत्न केले.