IND Vs BAN – मुंबईचा पठ्ठ्या करणार टीम इंडियाचं सारथ्य, टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा

बांगलादेश आणि टीम इंडिया यांच्यामध्ये 6 ऑक्टोबर पासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी BCCI ने टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

बांगलादेशचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला असून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला असून दुसरा कसोटी सामना कानपुरमध्ये सुरू आहे. मात्र याच दरम्यान BCCI ने आगामी बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर IPL मध्ये वेगावर स्वार होणार जलदगती गोलंदाज मयंक यादवला सुद्धा या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे.

याबरोबरच हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, रियान पराग, जितेश शर्मा या युवा खेळाडूंना बीसीसीआयने संधी दिली आहे. तसेच जसप्रीत बुमराह, यशस्वी जैसवाल, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे.

हिंदुस्थानी संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकु सिंग, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदिप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव