EVM हटाव लोकशाही बचाव! भाजपने लोकशाहीचा खून केला, बच्चू कडू यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महायुतीने 200 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक अनाकलनीय निकाल लागले. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यासारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर विदर्भात अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनाही पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या प्रवीण तायडे यांनी त्यांना 12,131 मतांनी पराभूत केले.

पराभवानंतर बच्चू कडू यांनी एक ट्विट करत भाजपवर हल्ला चढवला. भाजपने लोकशाहीचा खून केल्याची टीका बच्चू कडू यांनी केली. तसेच संविधान दिनाच्या (26 नोव्हेंबर) दिवशी लॉन्गमार्च काढण्याची घोषणा केली आहे.

भाजपने लोकशाहीचा केलेला खून आम्हाला अमान्य आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या! असे म्हणत अमरावतीतील चांदुरबाजार ते कलेक्टर ऑफिसपर्यंत लॉन्गमार्च काढण्याची घोषणा केली. यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांन केले.