देवेंद्र फडणवीस हे सर्वात वाईट गृहमंत्री, अतुल लोंढे यांची महायुती सरकारवर घणाघती टीका

आतापर्यंत जितके गृहमंत्री झाले त्यात सर्वात वाईट गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असल्याची घणाघती टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. महायुतीचे तिन्ही पक्ष म्हणजे गॅंगवॉर असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले अतुल लोंढे?

माध्यमांशी संवाद साधताना अतुल लोंढे म्हणाले की, ”महाराष्ट्रात आतापर्यत खूपच चांगले गृहमंत्री झालेत. महाराष्ट्रातले सर्वात वाईट गृहमंत्री कोण असं कोणी विचारलं तर, त्यात नाव येईल देवेंद्र फडणवीस यांचं. याचा अर्थ स्पष्ट आहे की, हे तिन्ही पक्ष गॅंगवॉरमध्ये गुंतले आहेत.”