‘आदर्श’ घोटाळय़ाचा दबाव! अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला!!

‘आदर्श’ घोटाळय़ाच्या दबावाखाली असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत कालपर्यंत सक्रिय असलेल्या अशोक चव्हाण यांनी आज सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कॉँग्रेस कार्यसमिती आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडले. चव्हाण हे भाजप पिंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून काँग्रेसच्या काही आजी-माजी आमदारांची त्यांना साथ असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. डॅमेज पंट्रोलसाठी पक्षश्रेष्ठाRचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीतील प्रमुख नेते अलर्ट मोडवर आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा झाला होता. त्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते. नुकत्याच झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीयनअधिवेशनात मोदी लोकसभेत 2014 पूर्वीच्या आर्थिक घोटाळय़ांबाबत एक श्वेतपत्रिका सादर केली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या राजवटीतील ‘आदर्श घोटाळय़ा’चा उल्लेख होता. या घोटाळय़ाच्या चौकशी अहवालात चव्हाण यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. आदर्श घोटाळय़ाची फाईल अजूनही क्लोज झालेली नसल्याने अशोक चव्हाण यांच्यावर भाजपकडून कोणतीही कारवाई केली जाऊ शकत होती. त्याच दडपणाखाली ते सतत होते आणि दुसरीकडे राज्यातील काँग्रेस श्रेष्ठाRशीही त्यांचे अपेक्षेप्रमाणे जमत नव्हते. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या धक्कातंत्राला बळी पडत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याची चर्चा आहे.

आगे आगे देखो होता है क्या!

काँग्रेस पक्षातील अनेक नेते आमच्या संपका&त आहेत. या नेत्यांची पक्षात घुसमट होत असून जनतेशी बांधिलकी असलेले नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक विधान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत काँग्रेस पक्षाला आणखी खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

मोदी-फडणवीसांनी केलेल्या टीकेचे व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने भाषण व्हायरल होत आहे. आदर्श सोसायटी उभारण्याच्या नावाखाली शहीदांच्या कुटुंबीयांची फसवणूक केली. यामागे कोण आहे हे नांदेड आणि संपूर्ण देशाला माहीत आहे, असे नमूद करत मोदींनी अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले होते. तर अनेक मंत्रिपदे आणि मुख्यमंत्रीपद मिळूनही अशोक चव्हाण नांदेडचा विकास करू शकले नाहीत. लीडर नाहीत ते डीलर आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. छत्रपती संभाजीनगरातील सभेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही हा व्हिडिओ गर्दीला ऐकवला.

राज्यातील कॉँग्रेस आमदारांची 14 तारखेला बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक 14 फेब्रुवारीला बोलविण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या राज्यातील सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. हे आमदार कोण? याची चाचपणी काँग्रेसच्या वरिष्ठांकडून केली जात असून आणखी पडझड होऊ नये यासाठी राज्यातील नेते कामाला लागले आहेत.

15 फेब्रुवारीला भाजप प्रवेश ?

पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची येत्या 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. त्याच सभेमध्ये अशोक चव्हाण व अन्य काँग्रेस आमदार भाजपवासी होणार असल्याचे सांगितले जाते.
n अशोक चव्हाण यांनी उद्या मंगळवारी आपल्या मुंबईतील निवासस्थानी त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांची बैठक बोलवली आहे. त्या बैठकीला 18 विद्यमान आमदार, 40 माजी आमदार आणि काही माजी खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

काँग्रेसचे दिल्लीतील नेते अलर्ट मोडवर

काँग्रेस नेते राहुल गांधी हे पक्षाला बळ देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा करत असताना महाराष्ट्र आलेल्या या राजकीय भूपंपात पक्षाची पडझड थांबवण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे राहिले आहे. अशोक चव्हाण यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर काँग्रेसचे दिल्लीतील नेते अलर्टमोडवर आले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते.

विश्वासदर्शक ठरावावेळी 11 आमदार होते गैरहजर

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची काही मत फुटल्याने चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला होता. मिंधे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावा वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, जीतेश अंतापूरकर, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हबंर्डे, शिरीष चौधरी हे 11 आमदार गैरहजर होते. त्या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘‘मतदानाला अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱया अदृश्य हातांचा आभारी आहे,’’ असे विधान केले होते.

इंडिया शायनिंगच्या वेळीही लोक पक्ष सोडून गेले होते

काँग्रेसमधून नेते जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही इंडिया शायनिंगच्या वेळीदेखील सर्व जण पक्ष सोडून जात होते. त्या वेळी पक्षासोबत जे राहिले ते मोठय़ा जिद्दीने लढले आणि आमचे सरकार आले. या वेळीदेखील असेच काहीतरी होईल, असा विश्वास कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला आहे.

चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?

अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते, चर्चा करीत होते, आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाणसुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय, आपल्या देशात काहीही घडू शकते, असा टोला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

चव्हाणांनी दबावातून पक्ष सोडला

मी काँग्रेस सोडणार असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जातात. हा भाजपच्या मनाचा खेळ असल्याचे स्पष्ट करत आमदार प्रणिती शिंदे यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून वारंवार केवळ विरोधी नेत्यांवर दबाव आणला जातो. चव्हाण यांनी केवळ हा त्रास वाचवण्यासाठी हतबल होऊन काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

मी आजही काँग्रेसचा कार्यकर्ता

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान विश्वजीत कदम यांनी मी आजही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट केले. पलूस कडेगावच्या जनतेने पतंगराव कदम यांना भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे. त्यामुळे माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनात त्यांना विश्वासात न घेता मी कोणताही निर्णय घेणार नाही. कुठलाही गैरसमज पसरवू नये, विश्वजीत कदम म्हणाले.

आणखी कोण सोडणार काँग्रेसचा ‘हात’?

अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे इतरही अनेक आमदार वेगळी वाट धरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अस्लम शेख, झिशान सिद्दिकी, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, धीरज देशमुख, सुरेश वरपूडकर, कुणाल पाटील, अमित झनक, जितेश अंतापूरकर, राजू आवळे, मोहन हंबरडे, माधवराव जवळगावकर, शिरीष चौधरी, अमीन पटेल यांच्या नावांची चर्चा आहे. परंतु वडेट्टीवार, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे यांनी इन्कार केला आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही राजीनामा दिला आहे.

नाना पटोले दिल्लीत

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षात खळबळ माजली आहे. चव्हाण यांच्या समर्थनार्थ अनेक आमदार पक्ष सोडून जाणार असल्याची कुणकुण लागल्याने पटोले यांनी आज तातडीने दिल्ली गाठली. तिथे त्यांनी पक्षश्रेष्ठाRची भेट घेऊन महाराष्ट्रात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चर्चा केली अशी माहिती आहे.

कुठे जायचे अजून ठरवायचेय

राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. काँग्रेसमध्ये असताना आपण प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. माझ्या मनात वैयक्तिक कुणाबद्दलही वेगळी भावना नाही. मी सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये आहे आणि आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असे मला वाटते. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. कुठे जायचे अजून ठरवायचेय. याबाबत विचार करून एक-दोन दिवसांत माझी दिशा ठरवेन, असे अशोक चव्हाण म्हणाले.

मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेत ‘आदर्श’चा उल्लेख

केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळातील आर्थिक गैरव्यवस्थापनाबाबत श्वेतपत्रिका सादर केली. यामध्ये आदर्श घोटाळय़ाची अद्याप ट्रायल सुरू असल्याचे म्हटले आहे. यूपीए सरकारच्या काळात झालेल्या अनेक घोटाळय़ांसह आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळय़ाचादेखील त्यात समावेश आहे. रक्षा भूमी परियोजना अपार्टमेंट अलॉटमेंट प्रकरणात झालेल्या अनियमिततांशी संबंधित हे प्रकरण कोर्टाच्या ट्रायल स्टेजमध्ये असल्याचे श्वेतपत्रिकेत सांगण्यात आले आहे. आदर्श प्रकरण उकरले जाताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला. चव्हाण यांनी दबावातून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.