‘टाईप 2’ मधुमेहींसाठी संशोधन

मद्रास  डायबेटिस रिसर्च फाऊंडेशनने (एमडीआरएफ) ‘टाइप 2’ मधुमेहाने (टी2डी) पीडित प्रौढ व्यक्तींमधील कार्डियोमेटाबोलिक जोखीम घटकांवर सुक्रलोजच्या परिणामाबाबत भारतातील पहिले संशोधन नुकतेच प्रकाशित केले. आशियाई भारतीयांमधील कॉफी/चहामध्ये टेबल शुगरच्या (सुक्रोज) जागी कृत्रिम स्वीटनर सुक्रलोज  वापरण्याच्या परिणामांचा शोध घेण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या मोहिमेत ‘टी2डी’ने पीडित 179 भारतीयांची तपासणी करण्यात आली.

या संशोधनाच्या निष्कर्षातून असे निदर्शनास येते की, कॉफी व चहा यांसारख्या दैनंदिन पेयांमध्ये कमी प्रमाणात सुक्रलोजचा वापर केल्यास त्याचा ग्लायसेमिक मार्कर्सवर कोणताच प्रतिकूल परिणाम होत नाही. दुसरीकडे या संशोधनामधून शरीराचे वजन (बीडब्ल्यू) कमरेचा घेर (डब्ल्यूसी) आणि बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) यामध्ये काहीशी सुधारणा निदर्शनास आली आहे. एनएनएसच्या परिणामाची तपासणी याआधीही अनेक संशोधन मोहिमांमध्ये केली गेली आहे, परंतु चहा किंवा कॉफी यांसारख्या दैनंदिन पेयांमधून सेवन केल्या जाणाऱ्या एनएनएसच्या परिणामांबाबत अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ‘एमडीआरएफ’चे नवे संशोधन भारतातील मधुमेहाने पीडित अनेक व्यक्तींसाठी महत्त्वाचे आहे, कॉफी आणि चहा ही पेये साखर सेवनाचे संभाव्य दैनंदिन स्रोत आहेत. तसेच भारतीयांमध्ये कार्बोहायड्रेटचे सेवन, विशेषतः भात किंवा रिफाइन्ड गहूचे सेवन सर्वाधिक आहे. त्यामुळे ‘टी2डी’चा धोका अधिक वाढतो. डब्ल्यूएचओने शरीराच्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एनएनएसचा वापर करण्यासंदर्भात सावध केले असताना हे संशोधन करण्यात आले आहे.

या संशोधनाचे नेतृत्व एमडीआरएफचे अध्यक्ष व सीनियर डायबेटोलॉजिस्ट डॉ. व्ही. मोहन यांनी केले. ‘हे संशोधन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीयांच्या आहारविषयक सवयी उर्वरित जगाच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात विभिन्न आहेत. सामान्यतः भारतात चहा किंवा कॉफी यांसारख्या दैनंदिन पेयांमध्ये साखरेऐवजी एनएनएसचा वापर केला जातो. त्यामुळे पॅलरी व साखरेचे सेवन कमी करण्यास आणि आहारविषयक अनुपालन वाढवण्यास मदत होऊ शकते. चहा व कॉफी यांसारख्या दैनंदिन पेयांमध्ये स्वीकार्य एडीआयअंतर्गत (अॅक्सेप्टेबल डेली इनटेक) सुक्रलोजसारख्या एनएनएसचा योग्य वापर सुरक्षित असल्याचे दिसून येते.