भटकंती- हत्तींचे अनोखे अनाथालय!

>> नीलेश गायकवाड

आपण कोणी विचार तरी करू शकतो का, की वन्य जिवांचेदेखील अनाथालय असू शकते? आपण आपल्याकडे मुलांसाठी अनाथाश्रम, वृद्धांसाठी अनाथाश्रम असे ऐकतो, पण श्रीलंकेत पिन्नावाला या खेडेगावात हत्तींचे अनाथालय आहे.

श्रीलंकेत जेव्हा सर्वप्रथम गेलो, तेव्हा सर्वात पहिले मी काय पाहिले असेल तर ते म्हणजे पिन्नावाला.

श्रीलंकेत कोलंबोपासून कॅन्डी शहराकडे जात असताना साधारण कोलंबोपासून 90 किमी अंतरावर स्थित असलेलं हे पिन्नावाला. किगले या शहरापासून वायव्येला असलेलं पिन्नावाला.

आपण कोणी विचार तरी करू शकतो का, की वन्य जिवांचेदेखील अनाथालय असू शकते? आपण आपल्याकडे मुलांसाठी अनाथाश्रम, वृद्धांसाठी अनाथाश्रम असे ऐकतो, पण श्रीलंकेत पिन्नावाला या खेडेगावात हत्तींचे अनाथालय आहे.

या अनाथालयाचा मुख्य हेतू म्हणजे आशियाई हत्तींना नैसर्गिक वातावरणात राहता यावं किंवा त्यांची नैसर्गिक वाढ व्हावी हा होता. या ऑर्फनेजमध्ये हत्तीची पैदास, त्यांचे संवर्धन या गोष्टींकडे लक्ष पुरविले जाते. सुरुवातीला जेव्हा हे चालू केले गेले त्या वेळेस भटकणाऱया हत्तीच्या पिलांना आसरा देण्यासाठी, त्यांच्या खाण्यापिण्याची नीट व्यवस्था व्हावी यासाठी हे सुरू केले गेले.

हे अनाथालय सुरू करण्यामागचे उद्दिष्टय़ असे की, अनाथ झालेल्या हत्तींच्या पिलांना एक आसरा मिळावा. कारण बऱयाचदा हत्तींच्या कळपातून वेगळे झालेले किंवा जंगलात पकडण्यासाठी जे खड्डे खोदलेले असतात, त्यामध्ये पिल्लू अडकल्यामुळे किंवा त्या पिलाची आई अडकल्यामुळे हत्तींची पिल्लं किंवा मोठे हत्ती कळपापासून वेगळे होतात. काही वेळेला असं पण होत होतं की, शेताची नासधूस केल्यामुळे शेतकरी लोक हत्तींना मारत असत किंवा त्यांची शिकार करीत असत. अशा वेळी त्यांच्या अनाथ झालेल्या पिलांना या अनाथालयात आणून त्यांची देखभाल केली जात असे. वनसंवर्धन खात्याने पिन्नावाला अनाथालयाची स्थापना त्याचसाठी केली.

पिन्नावाला येथील हे अनाथालय ‘महा ओया’ नदीच्या पात्रालगत असलेल्या 25 एकर जागेत वसलेले आहे.

सन 1975 साली श्रीलंकेतील वनसंवर्धन खात्याने हे अनाथालय सुरू केले. नंतर या अनाथा}यात साधारण 1982 पासून हत्तींच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी ण्aज्tग्न ँrााdग्हु झ्rदुस् सुरू केला. या झ्rदुस् मध्ये 20 हत्तींचा समावेश होता.

हे अनाथालय जेव्हा सुरू केले गेले त्या वेळेस येथे हत्तींची फक्त 5 पिल्ले होती आणि आता ती संख्या बरीच वाढली आहे. येथे हत्तींना मुक्त विहार करण्यासाठी सोडलेले असते. त्यांना कोणत्याही प्रकारचे तणाव निर्माण होईल असे वागविण्यात येत नाही किंवा मारहाण करण्यात येत नाही. या सर्व हत्तींची देखभाल करण्यासाठी तेथे 100 च्या वर माहुतांची एक टीमच तैनात आहे. येथे प्रत्येक मोठय़ा हत्तीला 75 किलो हिरवा चारा आणि हत्तींच्या पिलांना बाटलीतून दूध देण्यात येते.

कोणतेही निर्बंध नसल्याने येथे हत्तीदेखील मुक्त संचार करताना आढळतात. 1984 साली येथे कळपात पहिल्या पिल्लाचा जन्म झाला. 1978 साली तर ण्aज्tग्न ँrााdग्हु झ्rदुस् सुरू केलेलाच होता, पण आता काही स्थानिक लोकांच्या आणि काही विदेशी लोकांच्या प्रयत्नातून या झ्rदुस् ला एक वैज्ञानिक स्वरूप देण्यात आले आहे आणि त्यामुळे आशियाई हत्तींच्या संख्येत वाढ होण्यासाठी भरपूर मदत झाली आहे व हत्तींची संख्या वाढवण्यातदेखील यश आले आहे.

असे म्हणतात 1850 साली ब्रिटिशांच्या आाढमणाच्या अगोदर श्रीलंका बेटावर हत्तींची संख्या 30 हजार (तीस हजारांहून अधिक) होती, पण ब्रिटिशांनी हौसेखातर शिकार केल्यामुळे आशियाई हत्ती जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर होते. पण श्रीलंकन सरकारने हे अनाथालयाचे पाऊल उचलल्यामुळे श्रीलंकेत आज हत्तींची संख्या 3000 हून अधिक झाली आहे.

या अनाथालयाला भेट देण्याची वेळ म्हणजे सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6. सकाळी 8.30 ला हे अनाथालय खुले होते. सकाळी साधारण 9.15 ते 9.30 च्या दरम्यान या हत्तींची आपल्यासारखंच नाश्त्याची वेळ असते. खाऊन झाले की, या हत्तींना स्नानासाठी नदीवर नेण्यात येते. तेथून परत आल्यावर पुन्हा हत्तींच्या पिल्लांना बाटलीतून दूध पाजण्यात येते आणि मग पुन्हा नदीवर नेण्यात येते.

गमतीशीर गोष्ट म्हणजे काही विशिष्ट लोकांना स्वत हत्तींना बाटलीने दूध पाजण्याची संधीदेखील दिली जाते.

हत्तींना नदीवर नेल्यावर हत्तींना स्नान करताना पाहणे हा नयनरम्य देखावा बघण्याचा योग ज्याला आला तो खरंच नशिबवान! तेव्हा जगातलं हे अनोखं अनाथालय आपण बघायलाच हवं.