वेब न्यूज – अजब लग्नाची गोष्ट

>> स्पायडरमॅन

सर्व धर्म, जाती, पंथ आपल्या परंपरेप्रमाणे हा लग्नविधी पार पाडत असतात. मात्र काही लग्नाच्या परंपरा या सर्वसामान्य माणसाला अचंबित करणाऱ्या आणि कोड्यात टाकणाऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर पश्चिम आफ्रिकेतील अशाच एका आदिवासी समूहाच्या अनोख्या लग्न पद्धतीची जोमाने चर्चा होत आहे.

आपल्या देशाप्रमाणे इतर अनेक देशांत आदिवासी समूह आजही अस्तित्वात आहेत आणि ते आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे पालन करत असतात. पश्चिम आफ्रिकेतील असाच एक आदिवासी समूह म्हणजे वोदाब्बे समूह. या समूहात लग्नाची एक अनोखी परंपरा आहे. या परंपरेत लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या पुरुषाला दुसऱया पुरुषाची बायको पळवून न्यावी लागते. अर्थात ही स्त्राr तिच्या इच्छेने या पुरुषाबरोबर पळून जायला हवी. असे जर घडले तर वोदाब्बे समूहाच्या परंपरेनुसार त्यांचे लग्न लावून दिले जाते.

ही परंपरा पुरुषाच्या दुसऱया लग्नासाठी आहे. या आदिवासी समूहात पुरुषाचे पहिले लग्न हे त्याच्या आणि मुलीच्या कुटुंबाच्या मर्जीने लावले जाते. पहिल्या लग्नानंतर जर पुरुषाला दुसरे लग्न करायचे असेल तर मात्र त्याला परपुरुषाची बायको तिच्या इच्छेने पळवून न्यावी लागते. या पळवण्याच्या कार्यक्रमाचेदेखील सामूहिक आयोजन केले जाते. एक मोठा समारोह आयोजित केला जातो. या समारंभात दुसऱया लग्नासाठी इच्छुक असलेले पुरुष नटून थटून, चेहऱयाला रंग फासून सहभागी होतात.

या समारंभाला गेरेवोल उत्सव म्हणतात. या उत्सवात हे इच्छुक पुरुष नाचगाणी आणि इतर विविध प्रकारच्या कलांनी त्यांच्या आवडत्या विवाहित स्त्राrला भुरळ घालायचा प्रयत्न करतात. मात्र हे सर्व करत असताना तिच्या नवऱयाला यासंदर्भात काही कळू द्यायचे नसते. जर आवडती स्त्राr भुलली तर दोघेही तिथून पळ काढतात. ही बातमी कळली की, मग सर्व लोक अशा जोडप्यांना शोधून आणतात आणि त्यांचे लग्न लावून देण्यात येते. या लग्नाला प्रेमविवाह म्हणून मान्यता देण्यात येते.