>> वैश्विक n [email protected]
पंधरा लाख किलोमीटरचा यशस्वी प्रवास, ठरल्याप्रमाणे 177 दिवसांत पूर्ण करून आपले ‘आदित्य-एल-1’ हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले सौरयान त्याच्या जागी स्थिरावले आहे. ‘इस्रो’चे हे मोठेच यश असून या मोहिमेशी निगडित सर्व शास्त्र्ाज्ञ आणि तंत्रज्ञ अभिनंदनास पात्र आहेत. विक्रम साराभाई यांच्यासारख्या द्रष्टय़ा शास्त्र्ाज्ञाच्या प्रेरणेतून उभी राहिलेली ‘इस्रो’ ही हिंदुस्थानची अवकाश संशोधन संस्था अतिशय जोमाने कार्यरत असल्याचं दिसून येतं. या संस्थेच्या विविध अंतराळ मोहिमांची दखल आज प्रगत राष्ट्रांनाही घ्यावी लागते. एकेकाळी ‘जीएसएलव्ही’ यानासाठी ‘क्रायजेनिक’ इंजिन पिंवा त्याचं तंत्रज्ञान द्यायला खळखळ करणारे देशही आता आपल्या संशोधकांचं कौतुक करू लागले आहेत ही आपल्या कर्तृत्वाची पावती असून यापुढे अंतराळ मोहिमांच्या स्पर्धेत जगाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. ‘एल-1’ या ‘लॅग्रॅन्ज’ पॉइंटवर गेलेल्या सौरयानाने पुन्हा एकदा आपलं वैज्ञानिक कौशल्य सिद्ध केलं.
2 सप्टेंबर 2023 ते 6 जानेवारी 2024 हा ‘आदित्य एल-1’ यानाचा अवकाशी मार्गक्रमणाचा काळ होता. त्यात कोणतीही बाधा न येता हे यान पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असलेल्या ‘लॅग्रॅन्ज-1’ या बिंदूवर स्थापित झाल्याने सूर्याचा सतत अभ्यास करणं सोपं होणार असून त्याचे निष्कर्ष सर्व जगाला उपयुक्त ठरणार आहेत. 1475 किलो वजनाच्या रॉकेटद्वारे उडालेल्या या यानाचं वजन 244 किलो असून त्यावर सूर्याच्या निरीक्षणासाठी विविध उपकरणं बसवली आहेत. आता हे यान ‘एल-1’ बिंदूवर का गेलं?
याचं उत्तर म्हणजे पाच लॅग्रॅन्ज बिंदूंपैकी ‘एल-1’ सूर्य-पृथ्वीच्या मध्ये, ‘एल-2’ पृथ्वीपलीकडे, एल-3 सूर्यापलीकडे तर ‘एल चार आणि पाच’ हे बिंदू कक्षेत खाली-वर आहेत. यातील 1 ते 3 बिंदू चल असून 4 आणि 5 हे स्थिर आहेत. तेथे काही उल्का, अशनी जखडले गेल्याची (ट्रोजन पिंवा ट्रप्ड) शक्यता आहे. एल-1 बिंदूची व्याप्तीही कमी नाही. तिथे यापूर्वीही अनेक यानं (प्रोब) गेली असून ते कार्यरत आहेतच.
सूर्याकडे झेप घेणारं पहिलं यान 1960 मध्ये अमेरिकेने सोडलं. त्याचं काम सूर्याचं जवळून भ्रमण-निरीक्षण करणं (फ्लाय-बाय) एवढंच होतं. तोपर्यंत अंतराळ तंत्रज्ञानही फार पुढे गेलेलं नव्हतं. आता त्या गोष्टीला 63 वर्षे झाली आहेत. कम्प्युटराइज्ड टेक्नॉलॉजी त्यावेळी केवळ कल्पनेत होती ती आता कल्पनातीत यश प्राप्त करत आहे. त्यामुळे 2018 पासून सौर मोहिमांना विशेष वेग आला. त्यावेळी ‘पार्कर प्रोब’द्वारे ‘नासा’ आणि ‘ईएसए’ म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी यानी संयुक्तपणे ‘सोलार टेलिस्कोप’चा हा यशस्वी प्रयोग केला. 2021 मध्ये या मोहिमेअंतर्गत सूर्याच्या ‘प्रभामंडला’चं त्याने अगदी जवळून निरीक्षण केलं. ‘करोना’ हा शब्द 2020 पासून ‘कोविड’शी निगडित झाल्यामुळे बदनाम झाला, पण 1980 मध्येही खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात हा ‘सोलार करोना’ (सौर प्रभामंडल) पाहण्यासाठी आम्ही रायचूरला गेलो होतो. सूर्याचं प्रभामंडल केवळ ‘खग्रास’ सूर्यग्रहणाच्या काळात सूर्य पूर्णपणे झाकला जातो तेव्हा जास्तीत जास्त नऊ मिनिटे दिसू शकतं. या वर्षी 8 एप्रिल रोजी अमेरिकेतून दिसणाऱया खग्रास सूर्यग्रहणात सूर्याची ‘खग्रास’ स्थिती पाच-सहा मिनिटांची असल्याने अनेकांना सौर प्रभामंडल पाहण्याचा योग येऊ शकतो (अर्थात आकाश ढगाळलेले नसेल तरच).
2020 मध्ये याच दोन संस्थांनी सूर्याविषयीचं भौतिकशास्त्र किंवा ‘सौरभौतिकी’चा अभ्यास करण्यासाठी ‘सोलार ऑर्बिटर’ पाठवलं. ते सूर्याकडून उत्सर्जित होणाऱया प्रचंड ऊर्जेचं मोजमाप करू लागलं. याशिवाय चीन, जपान या देशांनीही सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी यानं पाठवली आहेत. लॅग्रॅन्ज बिंदूची व्याप्ती काही लाख किलोमीटर असल्याने आणि तेथे सूयं-पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण शून्य होत असल्याने तिथे गेलेली यानं विनासायास सौर निरीक्षण करू शकतात.
सूर्याचा ‘ताप’ आपल्यापर्यंत पोचतो तो दीड कोटी किलोमीटर अंतरावरून, परंतु त्या उैर्जेचा जन्म होतो तो आणखी 7 लाख किलोमीटर आत पैर गाभ्यामध्ये. सूर्यप्रकाश कण तयार झाल्यावर तो त्याच्या पृष्ठभागापर्यंत यायला सुमारे 10 लाख वर्षे लागतात. नंतर मात्र तो निर्वात पोकळीतून 15 कोटी किलोमीटर असलेल्या आपल्या पृथ्वीपर्यंत अवघ्या सव्वाआठ मिनिटांत येतो.
‘आदित्य एल-1’ हे आपलं महत्त्वाकांक्षी सौरयान येत्या तीनेक महिन्यांत, अभ्यासपूर्ण डेटा (विदा) पाठवू लागेल. त्यात मुख्यत्वे सूर्याच्या ‘करोना’च्या अनेक थरांचं तापमान, उैर्जा उत्सर्जन, सौर ज्वाला, सौर वारे आणि त्यातील सूक्ष्मकणांची हालचाल याबरोबरच सौर प्रभामंडलाचं बदलतं तापमान आणि अंतराळातील वातावरणाचा ‘डेटा’ असेल. यातून सौर उैर्जेतील प्रारणांचा आपल्या कृत्रिम उपग्रहांसारख्या उपकरणांवर, पृथ्वीवरच्या संदेशवहनावर कसा परिणाम होतो याविषयी अधिक माहिती मिळेल. सूर्याबद्दलची काही कोडी उलगडतील तर काही नवे प्रश्नही सामोरे येऊ शकतील. या साऱया गोष्टी वैज्ञानिक-अभ्यासकांचा उत्साह सतत वाढवणाऱया ठरतात. आपल्या सौर यानाकडून पुढच्या पाच वर्षात मिळणारी माहिती जगालाही उपयुक्त ठरणार आहे.