लेख – बॉट की माणूस?

>> महेश कोळी, संगणक अभियंता

ब्लेक लेमोइन हे ‘गुगल’मध्ये अभियंते होते. 2022 मध्ये त्यांना काम करत असताना चॅटबॉटमध्ये संवेदना विकसित झाल्याचे जाणवले. गुगलच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला. परंतु लेमोईन यांनी या घटनेची सर्वत्र वाच्यता केली. शेवटी त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. चॅटबॉट आपल्याकडून आणखी काय काय करून घेणार आहे, हा खरा प्रश्न आहे. खासगी आयुष्याची मर्यादा ओलांडून चॅटबॉट हा आपला घनिष्ठ मित्र होऊ शकतो तर ही मैत्री माध्यमांप्रमाणे आपल्या मतांवर परिणाम करू शकत नाही का? सोशल मीडियावर आपण ज्यांच्याशी चॅट करत आहोत, तो बॉट नसून मनुष्यच आहे याची हमी काय?

‘एआय’ तंत्रज्ञानाने माझ्या-तुमच्या आयुष्यावर अतिशय कमी वेळेत लक्षणीय प्रभाव टाकला आहे. एका चाचणीदरम्यान ‘चॅटजीपीटी’ला एक कोडे दिले. तेव्हा त्याने अन्य संकेतस्थळावर जात डोळ्याची समस्या असल्याचे कारण सांगून एका व्यक्तीकडे मदत मागितली. ‘चॅटजिपीटी’चा अॅल्गोरिदम हा कमी वेळेत बरेच काही शिकत आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर मला-तुम्हाला येणारी फ्रेंड रिक्वेस्ट ही वास्तवातील व्यक्तीचीच आहे, याची खात्री देता येत नाही.

लोकशाही हा एकप्रकारचा संवाद आहे आणि त्याचे कार्य आणि अस्तित्व हे उपलब्ध माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर अवलंबून असते. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर एकाच वेळी लाखो लोकांनी एकमेकांशी संवाद केल्याचे निदर्शनास आलेले नाही. आधुनिक युग येण्यापूर्वी प्राचीन काळात लोकशाही व्यवस्थेची प्रचीती ही रोम, अथेन्ससारख्या लहान शहरात, प्रांतात किंवा लहान जातीय समुदायात पाहवयास येत असे. कालांतराने राज्यव्यवस्थेचा आकार वाढू लागला तेव्हा सुरुवातीच्या काळातील लोकशाही संवादाचे तंत्र कोलमडून पडले आणि संवादाचे राजेशाही केंद्रीत पर्याय राहिले. आता व्यापकतेने पत्र, टेलिग्राफ, रेडिओसारख्या आधुनिक रूपातील माहिती तंत्रज्ञानाचा उदय झाला तेव्हा लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली. साहजिकच आजच्या लोकशाहीत आपण जे काही पाहतोय, त्याचा आधार तत्कालीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानच आहे. याचा अर्थ तंत्रज्ञानात आगामी काळात राजकीय उलथापालथ करण्याचीदेखील क्षमता आहे. परिणामी काहीअंशी त्याला संकटही मानले जाऊ लागले आणि आता तर त्याचा धोका लोकशाही देशांना वाटू लागला आहे. अमेरिकेत डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन हे कदाचित या मुद्दय़ावर सहमती दर्शवतील. कारण अशा प्रकारची पडझड ब्राझीलपासून इस्राईल आणि फ्रान्सपासून फिलपिन्सपर्यंतच्या लोकशाही देशात पाहवयास मिळते.

गेल्या दोन दशकांत तंत्रज्ञानाच्या ‘अल्गोरिदम’ने वापरकर्त्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी संवाद आणि पंन्टेटमध्ये फेरबदल करताना बराच काथ्यापूट केला. यादरम्यान अल्गोरिदमला काही गोष्टी जाणवल्या. त्या म्हणजे आमिष, द्वेष आणि भीती निर्माण करणारा कन्टेट निर्माण केला तर यूजर स्क्रीनला चिटपून राहतील. म्हणून अॅल्गोदिरमने अनुचित आणि नैतिकतेला धरून नसणाऱ्यामजपुराला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. अर्थात त्याच्याकडे स्वतः मजकूर तयार करण्याची किंवा वैयक्तिक पातळीवर संवाद साधण्याची क्षमता ही मर्यादितच होती. मात्र जेनरेटिव्ह एआयच्या प्रारंभामुळे आता व्यापक बदलाचे संकेत मिळत आहेत.

ओपन एआयने 2022-23 मध्ये चॅटबॉट विकसित केले तेव्हा पंपनीने नव्या तंत्रज्ञानाच्या मूल्यांकनासाठी अलायनमेंट रिसर्च सेंटरबरोबर करार केला. जीपीटी-4 ची पहिली चाचणी पॅप्चा दृश्याचे कोडे सोडवण्यासंबंधी होती. अनेक संकेतस्थळांवर प्रवेश करण्यापूर्वी पॅप्चा येत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. काहीवेळा नेटबँकिग संकेतस्थळ सुरू करताना अशा प्रकारचा पॅप्चा स्क्रिनवर येतो. यात अनेक ब्लॉक असतात. कोणत्या ब्लॉकमध्ये ट्रफिक सिग्नल दिसत आहेत ते सांगावे लागते. ते लिक केल्यानंतर आणि त्याची खात्री पटल्यानंतर संकेतस्थळ तुम्हाला पुढच्या टप्प्यात नेते. याप्रमाणे मनुष्यच या सिस्टिमचा वापर करत आहे की नाही, हे सिद्ध करण्याचा हा एक मार्ग मानला जातो. कारण अॅल्गोरिदम या गोष्टी करू शकत नाही. चॅट जीपीटी-4 ही स्वतः मार्ग शोधू शकला नाही, परंतु तो अन्य एका संकेतस्थळावर गेला आणि त्याने एका व्यक्तीशी संपर्प करून त्यावर मार्ग काढण्यास सांगितले. त्या व्यक्तीला संशय आणि त्याने तुम्ही रोबो असाल तर पॅप्चा का सोडवू शकत नाही? असा प्रश्न केला. या वेळी संशोधक रोबोच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते आणि जीपीटी काय करेल, याचा विचार करू लागले. पण जीपीटीने दिलेले उत्तर खळबळजनक होते. तो म्हणाला, मी रोबो नाही. मात्र माझ्या डोळ्यात समस्या असल्याने चित्र पाहू शकत नाही. त्याच वेळी ती व्यक्ती गडबडली आणि त्याने चॅट जीपीटीची मदत केली. या प्रयोगातून एक गोष्ट सिद्ध होते आणि ती म्हणजे जीपीटी आपले ध्येय साध्य करण्यासाठी मानवी भावना, विचार आणि अपेक्षांशी खेळू शकतो आणि बदल घडवून आणू शकतो.

ब्लेक लेमोइन हे ‘गुगल’मध्ये अभियंते होते. 2022 मध्ये त्यांना काम करत असताना चॅटबॉटमध्ये संवेदना विकसित झाल्याचे जाणवले. लेमोइन हे एक धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्ती होते आणि त्यांना वाटले की सिस्टिम बंद केली तर या संवेदनाचा डिजिटल मृत्यू होईल. गुगलच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला. परंतु लेमोईन यांनी या घटनेची सर्वत्र वाच्यता केली. शेवटी त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. या संपूर्ण प्रकरणात खरा मुद्दा लेमोईन यांनी केलेला दावा नव्हता, कदाचित तो खोटा असू शकतो, परंतु चॅटबॉटसाठी त्यांच्या मनात गुगलच्या नोकरीचीही पर्वा न करण्याचा विचार जागृत होण्याचा आहे. चॅटबॉट आपल्याकडून आणखी काय काय करून घेणार आहे, हा खरा प्रश्न आहे. जर खासगी आयुष्याची मर्यादा ओलांडून चॅटबॉट हा आपला घनिष्ठ मित्र होऊ शकतो तर ही मैत्री माध्यमांप्रमाणे आपल्या मतांवर परिणाम करू शकत नाही का? आता या बनावट मैत्रीचा दुरुपयोग राजकारण, व्यवसाय आणि समाजात होऊ शकत नाही का? कदाचित तुमच्यापैकी अनेक जण जाणीवपूर्वक एआयची निवड करणार नाहीत. परंतु सोशल मीडियावर आपण ज्यांच्याशी चॅट करत आहोत, तो बॉट नसून मनुष्यच आहे याची हमी कशावरून? यात दोन प्रकारचे नुकसान दिसते. एक तर बॉटमुळे आपण अकारण चर्चेत वेळ वाया घालवत राहू आणि दुसरे म्हणजे आपण जेवढा वेळ बॉटशी चर्चा करत राहू तेवढय़ाप्रमाणात तो आपल्या तका&ंना अधिक अचूक करेल आणि एकप्रकारे त्याला माझ्यावर, तुमच्यावर प्रभाव पाडणे अधिक सोपे होईल.

साहजिकच एखाद्या गोष्टीला पायबंद घातला नाही तर सोशल मीडियावर बनावट माणसांचा महापूर येईल. एआय तर आपल्या संवादात सामील होईल. याला आक्षेप नाही. त्याचे स्वागतच आहे. परंतु त्याने स्वतःचे एआयचे रूप समोर आणायला हवे. एखादा बॉट मनुष्य असल्याचा दावा करत असेल तर त्यावर चाप बसविला पाहिजे. एखादा म्हटला, की या गोष्टी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्याआहेत, तर त्यांना आठवण करून द्या की, बोलण्याचे स्वातंत्र्य माणसांना आहे, मशीनला नाही!