आभाळमाया – पहिला अंतराळ – निवास’

>>वैश्विक [email protected]

सध्या चर्चा चाललीय ती सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकावर ‘अडकल्याची.’ त्याविषयी पुढच्या लेखात, पण आतापर्यंत जगातील 44 देशांचे मिळून 681 जण अंतराळात जाऊन आलेत. त्यापैकी 610 पृथ्वीच्या कक्षेपर्यंत पोचले. 24 जणांनी पृथ्वीपलीकडच्या कमी कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) प्रवास केला. 25 जण एकटे अंतराळयात्री होते. हिंदुस्थानचे राकेश शर्मासुद्धा 1984 मध्ये सोयुझ टी-11 या रशियन यानातून अंतराळात जाऊन आले. मुंबईत झालेल्या त्यांच्या सन्मानाच्या वेळी पत्रकार म्हणून त्यांना भेटता आलं.

स्पेस स्टेशनवर राहण्याचा विक्रम करणारे पहिले तीन अंतराळयात्री रशियाचे होते. रशियन त्यांना ‘का@स्मॉनॉट’ म्हणतात, तर अमेरिकन ‘अॅस्ट्रॉनॉट’! 1969 च्या जुलैमध्ये अमेरिकेने चंद्रावर माणूस उतरवला आणि रशियाचा (तेव्हाचं यूएसएसआर) हिरमोड झाला. ही या दोन देशांतल्या ‘कोल्डवॉर’ची कथा होती. अमेरिका आपल्या आधी चंद्रावर पोहोचली म्हटल्यावर रशियाचे अध्यक्ष ब्रेझनेव यांनी निर्णय घेतला की, आपण पहिले ‘स्पेस स्टेशन’ पाठवायचं आणि त्यावर ‘का@स्मॉनॉट’ना राहता येईल याची व्यवस्था करायची. या दोन देशांच्या ‘शीतयुद्धा’ने पृथ्वीवर अनेक ठिकाणी लढायांचा धुमापूळ घातला गेला तरी अंतराळ संशोधनातली ईर्ष्यात्मक स्पर्धा पुढे जगाच्या उपयोगी ठरली. इतपंच नव्हे तर कालांतराने या दोन्ही देशांनीच एकत्रितपणे पुढाकार घेऊन सध्याचं प्रचंड ‘स्पेस स्टेशन’ विकसित केलं.

तर ज्या ‘सॅल्यूत-1’ या अंतराळ स्टेशनला सोयुझ-11 माणसांसह जोडलं गेलं ते 19 एप्रिल 1971 रोजी रशियाने अंतराळात धाडलं. या अंतराळ स्थानकाचा कालावधी मुळातच खूप कमी म्हणजे सात महिन्यांचा होता. 18,425 किलो वजनाचं, 20 मीटर लांबीचं आणि 4 मीटर व्यासाचं हे अंतराळातलं पहिलं पृत्रिम स्थानक. ते पृथ्वीपासून फक्त 200 ते 222 किलोमीटर अंतराच्या लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत ठेवण्यात रशियाला यश आलं. सॅल्यूत-1 ने अंतराळात केवळ 175 दिवस घालवले. त्यातल्याच 24 दिवसांमध्ये त्यावर तीन प्रवासी येऊन गेले.

‘सोयुझ’ मालिकेतल्या यानांद्वारे सॅल्यूत-1 वर अंतराळयात्री आणि प्रथम निवासी पाठवण्याची तयारी करताना रशियाने आधी सोयूझ-10 हे मानवविरहित यान सोडलं होतं. मुळात 5 भाग वेगवेगळय़ा वेळी अवकाशात पाठवून तिथेच त्यांची जुळणी करून सॅल्यूत-1 पृथ्वीभोवती यशस्वी परिक्रमा करत होतं. सोयूझ-10 यानाला सॅल्यूत-1 स्पेस स्टेशनशी जुळवणी करता आली नाही.

सोयूझ-11ची पाठवणी करताना वैज्ञानिकांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. 7 जून 1971 या दिवशी सोयुझ-11 ने जॉर्जी डोव्रोवॉल्स्की, व्लादिस्लॅव वॉल्का@व आणि व्हिक्टर पेत्सानेव असे तीन अंतराळ प्रवासी सॅल्यूत-1 वर अल्पकालीन निवासासाठी निघाले. ठरल्या वेळेनुसार उड्डाण 7 जून 1971 रोजी पार पडलं. खरं म्हणजे कम्युनिस्ट रशियालाही सॅल्यूत-1 सोडण्याचा ‘मुहूर्त’ पाळायचा होता. युरी गागारिन यांच्या ‘वॉस्टॉक’ उड्डाणाला 12 एप्रिल 1971 या दिवशी दहा वर्षे पूर्ण होत होती. पण आयत्या वेळी तांत्रिक अडचणी आल्या आणि उड्डाण 19 एप्रिलला झालं होतं. त्यातही सोयुझ-10च्या अपयशानंतर तांत्रिक त्रुटी राहू नयेत अशीच रशियन वैज्ञानिकांची धारणा होती. तसेच अंतराळात माणूस ‘स्पेस स्टेशन’वर धाडण्याची घाईसुद्धा होती. न जाणे अमेरिकेने यातही चांद्रविजयासारखी बाजी मारली तर…! या स्पर्धेपायीच 1974 मध्ये चंद्रावर माणूस पाठवण्याचा बेत रद्द करून रशियाने ‘स्पेस स्टेशन’ची उभारणी केली होती.

सोयुझ-11 ने चांगली कामगिरी केली. त्यातून तीन अंतराळयात्री सॅल्यूत-1 वर 23 दिवसांसाठी राहायला निघाले होते. सर्व काही सुरळीत पार पडलं आणि आधी उल्लेख केलेले तीन स्पेस निवासी सॅल्यूत-1 वर व्यवस्थित पोचले. तिथे त्यांनी अनेक प्रयोग केले. त्याची नोंद असलेल्या टेप्स, फिल्म, तसंच बराच डेटा त्यांनी जमा केला. आता 29 जूनला पृथ्वीवर परतल्यावर या तिघांचं सर्वत्र काwतुक होणार होतं. पहिले अंतराळ-निवासी म्हणून देश-विदेशात प्रचंड सन्मान प्राप्त होणार होता. पण… विपरीत घडलं!

सॅल्यूत-1 पासून विलग होताना (अनडॉपिंग करताना) काहीतरी घोळ झाला. अंतराळयात्रीचं वर्प कम्पार्टमेन्ट आणि सर्व्हिस मोडय़ुल वेगाने भिरकावलं गेलं! या प्रक्रियेत आत बसलेले अंतराळयात्री बेशुद्ध झाले असावेत. त्याना ‘मॅन्युअली’ काहीच करता आलं नाही. मात्र 25 मिनिटांनी स्वयंचलित यंत्रणा कामाला लागली आणि अंतराळयात्रींना पृथ्वीवर आणणारी ‘पॅप्सूल’ सुखरूप उतरली. हे ठिकाण कझाकस्तानच्या नैऋत्येला 88 किलोमीटरवर असलेल्या कारझालमधल्या वाळवंटात होतं. ही पॅप्सूल उतरल्यावर प्रतीक्षा होती ती अंतराळ निवासी बाहेर येण्याची, पण त्यांच्याकडून कसलीच हालचाल दिसेना. तेव्हा मात्र रिकव्हरी टीमने दरवाजा पह्डला आणि आतलं दृश्य दारुण आणि करुण होतं. तिघेही अंतराळयात्री आपापल्या जागेवर बसले होते. मात्र त्यांच्या काना-नाकातून रक्त ओघळल्याचे दिसत होतं. रक्तातील ऑक्सिजन संपून कार्बन डायॉक्साईड वाढणारा ‘ऑस्पिक्सिया’ त्यांना झाला होता. जॉर्जीच्या शरीरात थोडी धुगधुगी होती. त्याला पृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तोही गेला. आजपर्यंतच्या माणसांच्या स्पेस प्रवासात मरण पावलेले ते पहिले तिघेजण! सारं जग हळहळलं. स्तब्ध झालं.