अभिप्राय – नर्मदामैय्याची परिक्रमा

>>अस्मिता प्रदीप येंडे

नर्मदा परामा करताना या प्रवासात विविध व्यक्ती लेखकाला भेटल्या. परामेच्या निमित्ताने अनेक अनोळखी माणसे जिवाभावाची झाली. कारण मनी एकच भाव असल्याने या परामेचे प्रवासी एका कुटुंबात बांधले जातात. ही त्या नर्मदा मैयाची कृपादृष्टी असते.

लेखक सुनील पांडे यांनी नर्मदा परामेशी जोडलेल्या तसेच परामावासीयांची निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱया 28 व्यक्तिमत्त्वांचे व्यक्तित्वदर्शन ‘नर्मदाकाठची माणसे’ या व्यक्तिचित्रणात्मक संग्रहातून घडवले आहे. तसेच नर्मदा परामेच्या पुस्तक वाचनाच्या सहवासातून जी माणसे स्नेहभावाने जोडली गेली, अशा व्यक्तींचे वर्णनपर लेख या पुस्तकात समाविष्ट होतात. या पुस्तकाची केंद्रबिंदू नर्मदा मैया आहे. सोपी भाषा, ओघवती निवेदन शैली आणि नेमकेपणा यामुळे पुस्तक वाचताना वाचक एक प्रकारे त्यात गुंतून राहतो. संक्षिप्त रचना असल्यामुळे लेखकाने शब्दबद्ध केलेले व्यक्तिचित्रण मनात खोलवर रुजते. पुस्तकाचा मूळ गाभा आध्यामिक असला तरी यातील व्यक्तिमत्त्व, त्यांची जीवनसरणी, परामा करताना आलेले दिव्य अनुभव, लाभलेले मानसिक समाधान आणि नर्मदाकाठी राबवलेले सामाजिक कार्य हे सर्व वाचताना आपल्यालाही एक सकारात्मक प्रेरणा मिळते. नर्मदा परामा करण्याचे योजिल्यावर तिचे नियोजन कसे असावे, कुठून सुरुवात करावी, परामा करताना सोबत काय न्यावे, परामा पायी करावी की वाहनाने करावी, अशा अनेक गोष्टींशी ओळख होते. जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी मनाने कायम नर्मदातीरी असणाऱया तिच्या लेकरांची ही प्रवासगाथा आहे.

जिथे मानवी प्रयत्न संपतात, तिथे दैव धावून येते हा अनुभव घेणाऱया माई कुंटे यांना आलेले दिव्य अनुभव वाचून अंगावर शहारे येतात. या परिक्रमेशी जोडलेल्या अनेक व्यक्तींच्या कार्याची महती लेखकाने वाचकांपर्यंत पोहोचवली आहे. जेणेकरून आपणही यातून प्रेरणा घ्यावी. तसेच ‘राणी रूपमती’, ‘अहिल्यादेवी होळकर’, ‘अश्वत्थामा’ या लेखांतून नर्मदा मातेच्या अस्तित्वाचे प्राचीन संदर्भही यात वाचायला मिळतील.

लौकिक जीवनात व्यस्त असणाऱया आपल्या शरीराला, मनाला ही परामा जाणीव करून देते की, ज्या गोष्टी आपल्याला सहजरीत्या प्राप्त होतात, त्यांची जाणीव ठेवावी. ‘नर्मदाकाठची माणसे’ या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकही या परामेचा भाग बनतो.

नर्मदाकाठची माणसे व्यक्तिचित्रण / लेखक : सुनील पांडे

प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन मूल्य : 200 रुपये )