दखल : परिपक्व उद्योग समूहातील कथा

प्रत्येक भारतीयाला टाटा उद्योगसमूहाबद्दल उत्सुकता आणि तेथील दिग्गज व्यक्तिमत्त्वांबदल, त्यांनी जोपासलेल्या मूल्यांबद्दल आदर आहे. आंतरराष्ट्रीय क्षितिजावर देशाला मानाचे स्थान मिळवून दिलेला हा जागतिक पातळीवरील उद्योगसमूह आपली दर्जेदार उत्पादने आणि सामाजिक मूल्यांची जोपासना यांसाठी ओळखला जातो. याच टाटा उद्योगसमूहातील उच्चपदस्थ व्यवस्थापक, टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट यांनी चोखंदळपणे चाळीस कथांची निवड करून लिहिलेले पुस्तक म्हणजे टाटा स्टोरीज. कॉर्पोरेट जगताच्या चौकटीतील शिस्त पाळताना मानवतेच्या भावनांचा, मूल्यांच्या जोपासनेचा उत्सव साजरा करणाऱया या प्रभावी कथा आहेत. मानवी आत्म्याच्या, प्रेमाच्या, यशापयशाच्या उत्कटतेच्या आणि उदात्त हेतूंचा गाभा असणाऱया या कथा वाचकांना मनोरंजक वाटतील आणि त्यांच्या मनावर कधीही न मिटणारी छाप पाडतील, त्यांचे जगणे अधिक समृद्ध करतील. आपले भवितव्य घडवताना या कथांमधील परिपक्व दृष्टिकोन आपल्याला उपयोगी ठरतो.

 टाटा स्टोरीज
 लेखक ः हरीश भट  अनुवाद ः व्यंकटेश अनंत उपाध्ये
 प्रकाशक ः साकेत प्रकाशन, औरंगाबाद
 पृष्ठे‰ः 224  मूल्य ः 229 रुपये