आळंदीत माऊलींच्या अश्वांचे आळंदीत आगमन ; उत्साहात स्वागत

अंकली येथील ( बेळगाव, कर्नाटक ) शितोळे सरकारांच्‍या वाड्यातून प्रस्थान झालेल्या श्रींचे अश्वांचे आळंदीत हरिनाम गजरात आगमन झाले. तत्पूर्वी सरदार हरप्रीतसिंह बिडकर, उमेश बिडकर यांचे श्रीकृष्ण मंदिरात अश्वांचे जोरदार स्वागत परंपरेने करण्यात आले.

अश्व अलंकापुरीत येण्यापूर्वी पुण्यात पाहुणचार घेत हरिनाम गजरात आळंदीत आले. सरदार हरप्रीतसिंह बिडकर, उमेशजी बिडकर परिवाराच्‍या वतीने अश्वांचे परंपरेने स्‍वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील परंपरेने श्रीगुरु हैबतबाबा दिंडीने सामोरे जात अश्वांचे स्वागत विसाव्याचे जवळ करण्यात आले.

या प्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख निरंजननाथ नाथजी, विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक ऋषिकेश पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, महादजीराजे शितोळे सरकार, उर्जितसिह शितोळे सरकार, अश्व चालक सेवक तुकाराम कोळी, अक्षय परीट, श्रींचे सेवक राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, मानकरी योगेश आरु, स्वामी सुभाष महाराज, आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यातील परंपरेने अश्वांचे माउली मंदिरातही देवस्थानचे वतीने स्वागत झाले. आळंदीत येथील फुलवाले धर्मशाळेत परंपरेने अश्वांचा मुक्काम राहणार आहे. येथे भाविक दर्शनास गर्दी करतात.