हिंदुस्थानी वायुदलाची ‘पॉवर’ ऑस्ट्रेलियात दिसणार

12 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ऑस्ट्रेलियात सैन्य अभ्यास पिच ब्लॅक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानी एअर फोर्सची तुकडी ऑस्ट्रेलियातील बेस डार्विन येथे पोहोचली. या सैन्य अभ्यासात 20 देशांतील वायुसेनेचे 140 हून अधिक विमान आणि 4400 सैनिक सहभागी झाले आहेत. यात वायुदलाचे सुखोई-30 एमकेआय, एफ-35, एफ-22, एफ-18, एफ-15 आणि टायफून लढाऊ विमाने दिसणार आहेत. हिंदुस्थानी वायुसैन्य दलात पायलट, इंजिनीअर, टेक्निशियन यांच्यासह 150 हून अधिक योद्धे सहभागी झाले आहेत.