राजन साळवी यांना पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे समन्स

सत्तेच्या जोरावर भाजप व मिंध्यांकडून राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते-आमदार राजन साळवी यांच्या घर आणि हॉटेलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी धाड टाकून चौकशी केली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा एसीबीने राजन साळवी यांना चौकशीचे समन्स बजावले आहे. एसीबीने साळवी यांना सोमवारी दुपारी बारा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.