पैचान कौन? आणखी एका गुंडाचा मिंधेसोबतचा फोटो संजय राऊत यांनी केला एक्स्पोज

‘गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य’ असा उल्लेख करत राज्यातील गुंडाराज समोर आणणाऱ्या फोटोंची शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मालिकाच लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा आणखी एका गुंडाचा फोटो संजय राऊत यांनी आज ट्विट केला आणि ‘पैचान कौन?’ म्हणत निशाणा साधला. ‘‘हे लाल सिंग महोदय आहेत. खंडणी, अपहरण अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुह्यांतील आरोपी. टीम मिंधेचे खास मेंबर… काय करणार तुम्ही?’’ असा सवालच संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.