मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा निनावी फोन

सोमवारी दुपारच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. ताज हॉटेल आणि विमानतळ या ठिकाणी बॉम्ब ठेवला असल्याचे सांगून कॉलरने फोन केला कट केला; परंतु तपासाअंती संशयास्पद काही आढळून आले नसल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन येण्याचे सत्र सुरूच आहे. आज दुपारी नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला. हॉटेल ताज आणि विमानतळ येथे बॉम्ब ठेवल्याचे सांगून कॉलरने फोन कट केला. त्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत संबंधित ठिकाणी तपासणी केली असता संशयास्पद असे काही आढळून आले नाही. उत्तर प्रदेशहून हा फोन आला असल्याचे सूत्रांकडून समजते. पोलीस अज्ञात कॉलरचा शोध घेत आहेत.