बारामती लोकसभानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची 1 लाख 41 हजार 15 मतांनी पराभव केला.
लोकसभेची निवडणूक ही स्वाभिमान आणि निष्ठेची बनली होती. निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांच्या विरोधात कोण असा तर्कवितर्क लावण्यात आला. शेवटी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली. जनतेने विश्वास सार्थ ठरवत डॉ. अमोल कोल्हे यांना दुसऱयांदा निवडून दिले.
पहिल्या फेरीपासूनच डॉ. अमोल कोल्हे हे आघाडीवर होते. विसाव्या फेरी अखेर अमोल कोल्हे लाखाच्या फरकाने पुढे होते. शेवटी 28 व्या फेरीनंतर अमोल कोल्हे यांना एकूण 6 लाख 97 हजार 883 मते मिळवून आढळराव पाटील यांचा 1 लाख 41 हजार 15 मतांनी पराभव करीत विजय प्राप्त केला. तर आढळराव पाटील यांना 5 लाख 57 हजार 785 इतके मते मिळाली.