Amol Kolhe News – बाप बदलला तरी, अमोल कोल्हेंनी केलेली कविता चर्चेत

बारामतीमध्ये शिवस्वराज्य यात्रा पार पडली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी एक कविता सादर केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

अमोल कोल्हे म्हणाले की,
किती बी दमदाटी केली, तरी लोकं आता बधत नाहीत
बघतोच तुला बघून घेतो, स्वाभिमानाच्या आम्हाला खपत नाही,
वस्तू चोरला, रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही
स्वार्थासाठी बाप बदलला तरी जनतेला ते काही पटत नाही
घड्याळ जरी चोरले तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे
जॅकेट घाला, योजना काढा हवा फक्त पवार साहेबांची आहे.


बारामतीच्या जनतेला कोल्हे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत तुम्ही आपली जबाबदारी पार पाडली, पण आता विधानसभा निवडणुकीत तुमची जबाबदारी मोठी आहे. ज्या माणसामुळे आपली दुचाकीच्या जागी चार चाकी आली, ज्या माणसामुळे आपली छपराची घरं गेली आणि स्लॅची झाली त्या माणसाचं नाव महाराष्ट्राच्या काळजावर कोरलं आहे अशा शब्दात कोल्हे यांनी शरद पवारांची स्तुती केली.