अमेरिकेचा ‘सिक्रेट बॉम्ब’ तयार

शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका नवीन शस्त्रांची निर्मिती करीत आहे. अमेरिकेचे शत्रू राष्ट्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर जमिनीत बंकर तयार करत आहे. मात्र हे बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने सिव्रेट बॉम्ब तयार केला आहे. तब्बल 2 हजार 270 किलोग्रॅमचा हा जीबीयू -72 बॉम्ब खूपच घातक आहे.  

जगभरातील काही देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असून युद्धात होणाऱया हवाई हल्ल्यापासून बचावासाठी मोठ मोठे बंकर तयार केले जातात. अमेरिकेसारख्या बलाढय़ देशाकडून होणाऱया हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी चीन, उत्तर कोरिया, आणि इराण बंकर निर्माण करीत आहे, मात्र हे बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने सिव्रेट बॉम्ब तयार केला आहे. मोजावे वाळवंटात या बॉम्बची चाचणी घेण्यात आल्याची चर्चा आहे. छायाचित्रकार इयान रेचियो यांनी अमेरिकेच्या हवाई दलातील केसी-135 टॅंकरमधून इंधन भरणाऱया बोईंग बी 1 या बॉम्बरचा फोटो काढला. या फोटोत बोईंग बी 1 च्या खाली एक भलामोठा बॉम्ब दिसत आहे.

  • विमानतज्ञ डेव्हिड सेनसिओटी रेकियो यांनी हा फोटो पाहिला या बॉम्बचे वजन 900 किलोग्रॅम असून हा एक सॅटेलाईट गाईडेड बॉम्ब आहे. मात्र नीट पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की हा एक नवीन बॉम्ब आहे. या बॉम्बचे नाव जीबीयू-72 असे असून त्याचे वजन तब्बल 2270 किलोग्रॅम आहे.