भाजपकडून अनेकदा इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले मिंधे गटाचे आमदार खासदारही भाजपचीच बोली बोलत असतात. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गद्दार गटाला फटकारले आहे. ”ज्या भाजपची तुम्ही पालखी वाहत आहात त्या भाजपची घराणेशाही बघा’, असे कडक शब्दात सांगत दानवे यांनी भाजपच्या घराणेशाहीची यादीच प्रसिद्ध केली आहे.
दानवे यांनी X वरून एक पोस्ट शेअर करत यात त्यांनी ही यादी प्रसिद्ध केली आहे. त्या यादीसोबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे. ” ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे 40 आमदार भाजपची पालखी धापा टाकत वाहत आहात, त्याच भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा. 2019 साली महाराष्ट्रातील भाजपचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांचा कौटुंबिक राजकीय वारसा देतो आहे. पहा, वाचा कारण याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागणार आहे. यापुढे देशाची यादी लागली तरी सांगा..
1. देवेंद्र फडणवीस (भाजपचे गंगाधरराव फडणवीस यांचे सुपुत्र)
2. पंकजा मुंडे (माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या)
3. आकाश फुंडकर (भाजपाचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र)
4. संतोष दानवे (सध्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र)
5. सुनील कांबळे (दिलीप कांबळे यांचे सुपुत्र)
6. सिद्धार्थ शिरोळे (माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र)
7. हेमंत सावरा (विष्णू सावरा यांचे सुपुत्र)
8. संदीप नाईक (भाजप नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र)
9. भरत गावित (माणिकराव गावित यांचे सुपुत्र)
10. मदन भोसले (प्रतापराव भोसले यांचे सुपुत्र)
11 . स्नेहलता कोल्हे (शंकरराव कोल्हे यांच्या सुनबाई)
12. मोनिका राजळे (राजदीप राजळे यांच्या पत्नी)
13. देवयानी फरांदे (एन. एस. फरांदे यांच्या सुनबाई)
14. समीर मेघे (दत्त मेघे यांचे सुपुत्र)
15. राणाजगजितसिंग पाटील (पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र)
16. संभाजी निलंगेकर (रुपाली निलंगेकर यांचे सुपुत्र)
17. राहुल कुल (सुभाष कुल यांचे सुपुत्र)
18. नमिता मुंदडा (स्व. विमान मुंदडा यांच्या सुनबाई)
19. राधाकृष्ण विखे पाटील (बाळासाहेब विखे पाटील यांचे सुपुत्र)
20. वैभव पिचड (मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र)
21. नितेश राणे (नारायण राणे यांचे सुपुत्र)
रस्त्यावरील शिवसैनिक पारखून, त्याला निवडून आणण्याचे काळीज फक्त शिवसेनेत होते.. आहे आणि राहणार! आयात उमेदवारांची जत्रा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन फिरत आहात. कायदेशीर लढाया येतील आणि जातील. कायम असेल ती निष्ठा आणि विश्वास”, अशा शब्दात दानवे यांनी भाजप व गद्दार गटाला फटकारले आहे.