पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर, महिला सुरक्षेसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

गेल्या काही दिवसांत राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या अत्याचाराविरोधात आणि महिला सुरक्षेबाबत जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. तेव्हा महाविकास आघाडीने हे आंदोलन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव विमानतळावरून जळगावला जाणार होते. त्यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर विमानतळाबाहेर आंदोलन केले. दानवे म्हणाले की आंदोलकांना रोखताना पोलिसांनी जी तत्परता दाखवली ती तत्परता बदलापुरात तक्रार दाखल करताना दाखवायला हवी होती. पोलिसांनी दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आपण आंदोलनावर अजूनही ठाम आहोत असेही दानवे म्हणाले.

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यात महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम नाही अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली. त्यामुळे
पंतप्रधानाकडे आम्ही माता-भगिनींच्या सुरक्षेची हमी मागितली. महाराष्ट्रात मजबूत सरकार नसल्याने पंतप्रधान यांनीच आता राज्यात लक्ष घालावे अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य, काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसूफ,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीनही उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)