मुलांच्या प्रश्नांवर 54 टक्के पालकांचे तोंडावर बोट

लहान मुले ही जन्मजात जिज्ञासू असतात. त्यांना रोज वेगवेगळे प्रश्न पडतात. परंतु देशातील 54 टक्के मुलांच्या प्रश्नांना पालकांकडे उत्तर नसल्याची माहिती अ‍ॅमेझॉन अलेक्साने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. अलेक्साच्या मदतीने कांतारने देशातील सहा शहरांतील 750 हून अधिक पालकांमध्ये हे सर्वेक्षण केले आहे. यातील 54 टक्के पालकांनी मुलांच्या प्रश्नावर आपल्याकडे उत्तरे नसल्याचे मान्य केले, तर 44 टक्के पालकांनी आयत्यावेळी उत्तरे तयार केल्याचे या वेळी सांगितले.

मुलांचे प्रश्न

‘कार कशी बनवायची?’, ‘विश्व किती मोठे आहे?’, ‘विमान हवेत कसे उडते?’, ‘मासे पाण्याखाली श्वास कसा घेतात?’, ‘हिवाळा आणि उन्हाळा यांमध्ये कोणता ऋतू येतो?’, ‘पालकांना काम का करावे लागते?’, ‘आपण भाज्या का धुतो? यांसारखे प्रश्न सर्वात जास्त छोट्या मुलांकडून आपल्या पालकांना विचारले जातात.