अमरावती जिल्ह्यातील युवासेना जिल्हा युवती अधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिह्यातील युवासेनेच्या जिल्हा युवती अधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. जिल्हा युवती अधिकारी – पियुषिका मोरे (अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे), सृष्टी वाघमारे (दर्यापूर, अचलपूर, मेळघाट), तेजस्विनी वानखेडे (तिवसा, मोर्शी).