दारूमुळे जगात दरवर्षी 26 लाख लोकांचे मृत्यू

दारूचे व्यसन अत्यंत वाईट आहे. परंतु दारू पिणाऱयाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दारुमुळे जगात दरवर्षी सुमारे 26 लाख लोकांचे मृत्यू होत आहेत, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. जगभरातील 40 कोटी लोक दारु आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आजारी पडत आहे. जगभरात होणाऱया एकूण मृत्यूंपैकी हे प्रमाण 4.7 टक्के आहे. म्हणजेच प्रत्येकी 20 मृत्यूपैकी एक मृत्यू दारूमुळे होतोय.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन अल्कोहोल अँड हेल्थ अँड ट्रीटमेंट ऑफ सबस्टेन्स यूड डिसॉर्डर’ अहवालात ही चिंताजनक आकडेवारी आहे. या अहवालानुसार, अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे मृत्यू यामध्ये मोजले तर ही संख्या 30 लाखांहून अधिक होते.

हिंदुस्थानात तर परिस्थिती आणखी खराब आहे. हिंदुस्थानात एक लाख मृत्यूपैकी दारुमुळे होणारे मृत्यू 38.5 टक्के आहेत. ही संख्या चीनपेक्षा दुप्पट आहे. चीनमध्ये एक लाख मृत्यूमागे दारु पिऊन मरणाऱयांची संख्या 16.1 टक्के आहे. दारुच्या अतिसेवनामुळे अनेक आजार होतात. यकृताशी संबंधित आजार आणि कॅन्सरचा समावेश आहे. 20 ते 39 वर्ष वयोगटातील लोक दारू आणि नशेचे शिकार होतात. त्यांचे प्रमाण 13 टक्के आहे.

अहवालानुसार, 15 वर्षांहून अधिक वय असलेले 31.2 टक्के लोक दारुच्या आहारी गेले आहेत. त्यापैकी 3.8 टक्के लोक मोठय़ा प्रमाणात दारू पितात. 12.3 टक्के लोक कधी तरी जास्त दारू पितात. हिंदुस्थानात 15 वर्षांहून अधिक वय असलेले 41 टक्के लोक दारु पितात. तर महिलांची संख्या 20.8 टक्के आहे.