अक्षय शिंदे याचा ‘फेक एन्काऊंटर’ आम्ही न्यायालयात जाणार – सुषमा अंधारे

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कायद्याची प्रक्रिया बायपास करत संपवून सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. या ‘फेक एन्काऊंटर ‘प्रकरणी आम्ही न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘पोलीस व्यवस्थेचा धाक, विश्वासार्हता राहिली पाहिजे. परंतु बदलापूर प्रकरणात सरकारची लक्तरे निघालेली आहेत. अक्षय शिदि याला कायदेशीर प्रक्रियेने मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे होती; परंतु अशा प्रकारे एन्काऊंटर करून प्रकरणे संपवायची असतील तर कायदा, पोलीस, कारागृहांची काय गरज आहे? या एन्काऊंटर प्रकरणाला मिंधे गटाचे नरेश म्हस्के ‘नैसर्गिक न्याय’ म्हणत आहेत. मग इतर प्रकरणांमध्ये हा न्याय का दिसून येत नाही? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमल्याचे सांगितले; परंतु यापूर्वी ड्रग्जसारख्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी समित्या नेमल्या. मात्र, कोणत्याच प्रकरणाचे चौकशी अहवाल समोर आले.

न्यायाधीशांच्या समितीकडूनच या प्रकरणाची चौकशी करावी ‘तेलंगणा प्रकरणातील एन्काऊंटर फेक असल्याचे चौकशी समितीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या 10 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या स्तरावरील न्यायाधीशांची चौकशी समिती स्थापन केली पाहिजे. न्यायाधीशांच्या समितीकडूनच या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. ठाण्यातून जे सत्ताकेंद्र चालते, त्यावर आमचा विश्वास नाही,’ असेही अंधारे म्हणाल्या.

संजय शिंदे वादग्रस्त पोलीस अधिकारी
‘एन्काऊंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहेत. विजय पलांडे याला पळवून लावण्यात त्यांचा हात होता. त्यामुळे त्यांना काही कालावधीसाठी सस्पेंड करण्यात आले होते. प्रदीप शर्मा यांचे ते जवळचे होते. त्यांनी ठाणे हद्दीत अनेक दिवस ड्युटी केली आहे. त्यामुळे तेथील प्रशासनावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,’ असेही अंधारे यांनी सांगितले. ‘ही संपूर्ण घटना राज्य प्रायोजित दहशतवाद आहे. हा ‘प्री-प्लॅन स्क्रिप्टेड एन्काऊंटर’ आहे,’ असा आरोपही अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेले प्रश्न
आरोपी अक्षय शिंदेला तळोजामधून बदलापूरमध्ये न्यायचे होते तर गाडी मुंब्याकडे का नेण्यात आली?
पोलिसांनी चार्जशीट रविवारीच का फाईल केले?
ज्या पिस्तूलमधून अक्षयवर गोळी झाडली, ते पिस्तूल अनलोडेड असते, मग अक्षय शिंदेला पिस्तुलाचे लॉक कसे काढता आले?
दोन्ही हातांत वेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कंबरेला लागलेले पिस्तूल कसे काढू शकतो?
अक्षय गतिमंद असल्याचे पोलिसांनीच सांगितले होते, मग तो एवढा हुशार कसा निघाला?
आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या मांडीवर गोळी झाडली; पण पोलिसांनी थेट त्याच्या तोंडावर गोळी का झाडली?
बदलापूर प्रकरणात शाळेचे सीसीटीव्ही फुटेज गायब करूनही संस्थाचालक आपटेला अद्यापि अटक का केली नाही?
नाहीत,’ असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.

अक्षयने झाडलेली गोळी पोलिसाच्या मांडीला लागली कशी?
बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘ती’ गोळी पोलिसाच्या मांडीला कशी लागली? सरकारने तातडीने याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे. त्या अधिकाऱ्याचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, बदलापूर प्रकरणामध्ये महायुती सरकार आरोपीला वेळेत पकडण्यात कमी पडले आहे. अनेक दिवस आरोपींना पकडण्यात आलं नाही. यंत्रणांकडून आरोपी आणि त्याला मदत करणारे कसे मोकळे सुटतील यासाठी प्रयत्न करण्यात आले. लोकांमध्ये असलेले संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी सरकारने यावावत माहिती द्यायला हवी. एका पोलीस अधिकाऱ्याला मांडीत गोळी लागली आहे. फायरिंग करणारा माणूस हा समोर फायरिंग करतो. त्यामुळे ती गोळी मांडीला कशी लागली, हासुद्धा एक प्रश्न अनुत्तरित राहिला असल्याचे आंबेडकर म्हणाले.

हात बांधलेले असतानाही आरोपीने गोळी झाडली कशी?
‘बदलापूर प्रकरणातील त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, ही माझी मागणी होती. मात्र, सोमवारी घडलेली घटना वेगळी आहे. आरोपीचे हात बांधलेले असताना, त्याच्या डोक्यावर कपडा घातलेला असताना तो गोळी चालवतोच कसा?’ असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याबाबत गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘एवढ्या पोलिसांसमोर आरोपीची हिंमत होतेच कशी? या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्र्यांनी यासंबंधी उत्तर दिले पाहिजे. हा देश संविधानाने चालतो. आपला देश कोणाच्या मर्जीन चालत नाही. संविधानामध्ये ही कृती बसत नाही. महाराष्ट्रात ‘एन्काऊंटर’ शब्द ऐकलेला नाही. हा एन्काऊंटर आहे का? याबाबत स्पष्टता करावी. आरोपीच्या मृत्यूनंतर काही ठिकाणी पेढेवाटप झाल्याचे ऐकले. त्याला जर फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना मी पहिला पेढा दिला असता,’ असेही त्या म्हणाल्या.