हाऊसफुल 5 च्या शूटिंगदरम्यान गुरुवारी अक्षय कुमार जखमी झाल्याचे वृत्त आहे. एका अॅक्शन सीक्वेन्सचे शूटिंग करत असताना सेटवर कुठली तरी वस्तू उसळली आणि त्याच्या डोळ्यावर आदळली. डोळ्याला दुखापत झाल्यानंतर लगेचच एका नेत्रतज्ञाला चित्रपटाच्या सेटवर बोलावण्यात आले. अक्षयचा डोळा तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला शूट न करण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला दिला आहे. अक्षयच्या दुखापतीमुळे चित्रपटाचे शूटिंग काही काळ थांबवले होते. त्यानंतर पुन्हा शूटिंग सुरू करण्यात आले. मात्र, अक्षयच्या सीनचे शूटिंग तो बरा झाल्यानंतरच केले जाणार आहे.