अजित पवार गटाचे सहा आमदार राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना भेटले

अजित पवार गटाच्या सहा आमदारांनी आज राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील यांची विधान भवनातील कार्यालयात भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पाच आमदारांनी कांदा प्रश्नी जयंत पाटील यांची गाठ भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सत्तेत असलेल्या आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे प्रश्न मांडण्याऐवजी ते पाटील यांना भेटल्यामुळे चर्चला उत आला आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या दारुण पराभवामुळे अजित पवार गटात चिंतेचे वातावरण आहे. त्यातच नाशिकचे दोन आमदार, पश्चिम महाराष्ट्रातील दोन आमदार आणि विधान परिषदेतील मराठवाडय़ातील एका आमदाराने जयंत पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.