अजित पवार पडले तोंडघशी, ज्या राज्यात NCP निवडणूकही लढली नाही तिथले आमदार भेटल्याचा दावा

अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली आणि या भेटीदरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा पार पडल्याचेही ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी रात्री केले होते. यासोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला होता. त्यात अजित पवारांव्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल आणि इतर मंडळी दिसत आहे. मात्र ज्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूकही लढली नाही तिथले आमदार भेटल्याचा अजित पवार यांचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खोडून काढल्याने ते तोंडघशी पडले आहेत.

अजित पवारांचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून रिट्विट करण्यात आले आहे. यात अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागीही झाला नव्हता. मग आमदार झाले तरी कधी? असा सवाल करण्यात आला आहे. यामुळे अजित पवार यांचा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

हे वाचा – ‘केसाने गळा कापू नका, अन्यथा…’, मिंधे गटाचा भाजपला इशारा, जागावाटपावरून ठिणगी

“काय….? अरुणाचलप्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार…? अहो, अरुणाचलप्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता… मग आमदार झाले तरी कधी ? हा आता… अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचलप्रदेशच्या यादीत दाखवले असतील, तर ती वेगळी गोष्ट…

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अरुणाचलप्रदेश आणि नागालँडमध्ये तितकाच फरक आहे जितका महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे, हे समजणं अत्यावश्यक आहे. आता घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आल्यानंतर हा राज्या राज्यातील फरकांचा गोंधळ उडणारच म्हणा…! त्यामुळे ज्या भाजपसोबत आपण गेलात त्यांच्या, खोटं बोल पण रेटून बोल या परंपरेचा वाण नाही पण गुण लागला हे दुर्दैव ! आपला रोखठोक बाणा अजूनही शाबूत असेल तर, चूक स्वीकारा पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका, ही नम्र विनंती!”, असे रिट्विट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून करण्यात आले आहे.