बारामतीत दुसरा आमदार झाला पाहिजे मग माझ्या कामाची किंमत कळेल असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच गरज सरो वैद्य मरो असे होता कामा नये असेही अजित पवार म्हणाले.
बारामतीत आज अजित पवार यांनी संवाद साधला. तेव्हा अजित पवार म्हणाले की 1991 साली आणि 1995 साली मी पंजा चिन्हावर निवडून आलो होतो. तर 1999 पासून मी घड्याळ्यावर निवडून येत आहे. 1991 के 2024 पर्यंत जी मी कामं केली त्याची तुलना करून पाहा. लोकसभेत वेगळी भूमिका घेतली नाही तरी पराभव झाला. बारामतीत माझ्याशिवाय दुसरा आमदार झाला तर माझ्या कामाची किंमत कळेल असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी भवन, कसबा-बारामती येथे जाहीर पक्ष प्रवेश https://t.co/RjLDLNmzYk
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 8, 2024
तसेच आपण विकासकामं करायची आणि जनतेला सांगायचं, ते त्यांचा निर्णय घेतील. पण विकासासाठी घड्याळ्याला साथ द्या असेही अजित पवार म्हणाले.