हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती पाहण्याची मुंबईकरांना संधी

हिंदुस्थानी हवाई दल आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने मुंबईत मरीन ड्राइव्ह येथे 12 ते 14 जानेवारी या कालावधीत दुपारी 12 ते 1 या वेळेत हवाई कसरतींचे आयोजन करणार आहे. चित्तवेधक कसरती आणि प्रात्यक्षिके, हिंदुस्थानी हवाई दलाचे कौशल्य, क्षमता याचे दर्शन यानिमित्ताने मुंबईकरांना घडणार आहे. या कार्यक्रमात सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिक पथक आणि ‘सारंग’ हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाद्वारे हवाई प्रात्यक्षिकांचा समावेश असेल. फ्लायपास्ट आणि सुखोई-30 एमकेआयद्वारे कमी उंचीवरील हवाई कसरती, ‘आकाशगंगा’ पथक आणि सी-130 विमानाद्वारे फ्रीफॉल आणि पॅराशूट प्रात्यक्षिकांसह विविध प्रकारच्या हवाई कसरतींचा समावेश असेल.