दर्जाहीन खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या राज्यातील 850 कृषी केंद्राना टाळे

कृषी विभागाने कृषी सेवा केंद्राच्या केलेल्या तपासणीत बियाणे कीटकनाशकांचे 292 नमुन्यांचे साठे अद्ययावत न आढळल्याने राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 850 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर 241 दुकानांचे परवाने काही काळासाठी निलंबित करण्यात आले आहेत.

कृषी विभागाने केलेल्या कारवाईत खते, बियाणे व कीटकनाशके यांच्या 17 नमुन्यांवर न्यायालयात याचिका दाखल झाल्या असून 61 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. महिनाअखेर राज्यात बियाणे, खते व कीटकनाशकांचा 255 मेट्रिक टन साठा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत अडीच कोटींपर्यंत आहे.