देवळाली, दिंडोरीत महायुतीत बंडखोरी

नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर देवळाली, दिंडोरीत मंगळवारी शिंदे गटातर्फे अधिकृत अर्ज दाखल करण्यात आले.

देवळाली मतदारसंघातून अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे या अधिकृत उमेदवार आहेत, त्यांनी अर्जही दाखल केला आहे. मंगळवारी शेवटच्या क्षणी शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली, त्यांनी अर्ज दाखल केला. असाच प्रकार दिंडोरीत घडला आहे. दिंडोरीतून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. आज शिंदे गटाकडून माजी आमदार धनराज महाले यांनी अधिकृत अर्ज भरला. एबी फॉर्म दिला गेल्याने अजित पवार गटाची शिंदे गटाने हेतुपुरस्कर कोंडी केल्याचे बोलले जात आहे.