मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आजपासून खुला करा! आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) उद्या, 1 जानेवारीपासून जनतेसाठी खुला करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ट्विटद्वारे  केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, दोन महिन्यांहून अधिक काळापासून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प पूर्णपणे तयार आहे. तरीही त्याच्या उद्घाटनासाठी वेळकाढूपणा केला जातोय. आता या पुलाच्या उद्घाटनासाठी जनतेला जानेवारीच्या मध्याची वाट पाहावी लागणार आहे. हेच का तुमचे लोकांसाठीचे सुशासन? उद्या, 1 जानेवारीपासून हा पूल जनतेसाठी खुला करा आणि कार्यक्रम नंतर आयोजित करा. जनतेने निवडून दिलेले सरकार असते तर त्यांनी नक्कीच असे केले असते; परंतु खोके आणि धोके याच्या बळावर निर्माण झालेले सरकार हे करणार नाही, असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.