आदित्य ठाकरे यांचा झंझावाती दौरा

इगतपुरी, सिन्नर, नाशिक येथे आज संवाद मेळावे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे उद्या बुधवार, 14 फेब्रुवारी रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघ दौऱयावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक येथे संवाद मेळावे होणार आहेत.

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे हे बुधवारी सकाळी दहा वाजता मुंबई येथून नाशिककडे रवाना होतील. दुपारी साडेबारा वाजता इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथील तुळसाई लॉन्स येथे, तीन वाजता सिन्नरच्या मातोश्री नर्मदा लॉन्स येथे ते संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करतील. सायंकाळी पाच वाजता नाशिकमध्ये नाशिकरोड भागातील जेलरोड येथील संत ज्ञानेश्वरनगर मैदानावर आयोजित मेळाव्यात ते संवाद साधणार आहेत.