वाढवण बंदराच्या उभारणीतही अदानींना ‘स्वारस्य’, देशातील चौदावे बंदर ‘अदानी पोर्ट’कडे जाण्याची चिन्हे

>> राजेश चुरी

देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून विकसित होणाऱया पालघरमधील वाढवण बंदराच्या उभारणीत गौतम अदानी यांच्या ‘अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिडेट’ या पंपनीने ‘स्वारस्य’ दाखवले आहे. या बंदराच्या उभारणीसाठी एल अॅण्ड टीसह अन्य पंधरा कंपन्यांनीही ‘स्वारस्य अर्ज’ सादर केले आहेत. देशातील चौदा प्रमुख बंदरे, देशातील सात विमानतळांसह धारावी पुनर्विकासाचे कामही अदानींना मिळाले आहे. त्यामुळे वाढवण बंदराच्या प्रकल्पातही ‘उद्योगपती मित्र’ बाजी मारतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

वाढवण बंदराचा सुमारे 76 हजार 200 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध आहे. पण वाढवण बंदरामुळे या भागाचा विकास होऊन आर्थिक चित्र बदलेल, बारा लाख रोजगार निर्माण होतील, हे बंदर देशातील सर्वात मोठे बंदर असेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदराच्या पायाभरणी सोहळय़ात केला होता.

या बंदराच्या उभारणीसाठी लागणाऱया पायाभूत कामांसाठी विविध कंपंपन्यांकडून स्वारस्य अर्ज मागवण्यात आले होते. हे अर्ज दोन दिवसांपूर्वी उघडण्यात आले तेव्हा एपूण देशातील पंधरा कंपन्यांनी स्वारस्य दाखवल्याचे पुढे आले. या अर्जांची छाननी केल्यानंतर हे अर्ज केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येतील. मग टेंडर काढण्यात येतील, असे ‘जेएनपीए’चे अध्यक्ष व ‘वाढवण प्रोजेक्ट प्रा. लि.’ चे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांनी सांगितले.

वाढवण बंदराच्या उभारणीसाठी कोणती कामे देणार

बंदराच्या उभारणीसाठी जागेचा विकास व देखभाल, गाळ काढणे, समुद्रात भरणी आणि वाढवण बंदरासाठी समुद्रात संरक्षक बांध बांधणे अशी कामे हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलअंतर्गत पीपीपी तत्त्वावर देण्यात येणार आहेत.

या कंपन्यांना स्वारस्य

जॅन जी नूल ड्रेजिंग इंडिया प्रा. लि., व्हॅन ऑर्ड ड्रेजिंग अॅण्ड मरिन का@ण्ट्रक्टर्स, रेल विकास निगम, ह्युंदाई इंजिनीयरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन पंपनी लि., विश्वसमुद्र इंजिनीयरिंग प्रा. लि., मिका इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., बोस्कालिस प्रा. लि., मेसर्स अशोका बिल्डका@न लि., दिनेशचंद्र अगरवाल इन्फ्रॉका@म प्रा. लि., अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इका@नॉमिक झोन लिमिटेड, लार्सन अॅण्ड टुब्रो लि., इंटरनॅशनल सी पोर्ट ड्रेजिंग लि., हिंदुस्थान इन्फ्रालॉग प्रा. लि., नॅशनल मरिन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रा. लि., श्रीगजानन फॅसिलिटीज प्रा. लि.

अदानींकडील देशातील बंदरांची नावे

पूर्वी या कंपनीचे नाव ‘गुजरात अदानी पोर्ट लिमिटेड’ असे होते. आता ‘अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इका@नॉमिक झोन लिमिटेड’ या नावाने देशातील 13 मोठी बंदरे चालवण्यात येतात.
 मुंद्रा पोर्ट (गुजरात)
 दहेज पोर्ट (गुजरात)
हजीरा पोर्ट (गुजरात)
 टुना टर्मिनल
मोर्मुगाव टर्मिनल (गोवा)
 दिघी पोर्ट (रायगड, महाराष्ट्र)
 विझिंजम पोर्ट (केरळ)
 एन्नोर टर्मिनल (तामीळनाडू)
कटूपल्ली टर्मिनल (तामीळनाडू)
 पृष्णापटनम पोर्ट (आंध्र प्रदेश)
 गंगावरम पोर्ट (आंध्र प्रदेश)
 धामरा पोर्ट (ओडिशा)
 हल्दिया पोर्ट (पश्चिम बंगाल)

नियोजित वाढवण बंदरातील गाळ आणि भराव टाकण्यासाठी आम्ही स्वारस्य अर्ज मागवले होते. या बंदराच्या उभारणीत पंधरा पंपन्यांनी ‘एक्प्ऱेशन ऑफ इंटरेस्ट’ दर्शवला आहे. पीपीपी मॉडेलवर हे बंदर उभारण्यात येणार आहे.
 उन्मेष वाघ, व्यवस्थापकीय संचालक, वाढवण बंदर प्रा. लि.