सनरुफमधून खडखड, डिफेक्टेड कॅमेरा; अभिनेत्रीने लँड रोव्हरवर ठोकला 50 कोटींचा दावा

सनरुफमधून सतत खडखड आवाज येतो, गाडीतला कॅमेरामध्येही खराबी, साऊंड सिस्टम नीट वाजत नाही अशा अनेक तक्रारी कुठल्या साध्या सुध्या गाडीत नाही तर चक्क लक्झरी गाड्यांमधील एक असलेल्या लँड रोव्हरमध्ये आढळून आल्या आहेत. अभिनेत्री रिमी सेनने या सर्व त्रासाला कंटाळून लँड रोव्हर कंपनीविरोधात 50 कोटींचा खटला दाखल केला आहे.

रिमी सेनने 2020 ला लँड रोव्हर गाडी घेतली होती. त्यानंतर लॉक डाऊन सुरू झाला. त्यामुळे ती गाडी जास्त वापरली गेली नाही. मात्र लॉक डाऊन संपल्यावर ती नियमितपणे त्या गाडीचा वापर करत होती. 25 ऑगस्ट 2022 रोजी रिमीने गाडीचा रिअर कॅमेरा खराब झाल्याची तक्रार दिली. त्या घटनेनंतर कारमधला एक एक तांत्रिक बिघाड समोर येऊ लागला.

अखेर या प्रकारांना वैतागून रिमीने लँड रोव्हरविरोधात 50 कोटींच्य़ा नुकसानभरपाईचा खटला दाखल केला. तसेच खटल्याच्या खर्चासाठी 10 लाख रुपयांचा दावा देखील केला आहे.