
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या शास्त्रीय नृत्यसेवेवरून वाद निर्माण झाला. अखेर प्राजक्ता माळी हिने माघार घेतली.
परंपरेप्रमाणे विश्वस्तांनी मंदिराच्या प्रांगणात तीन दिवसीय सांस्पृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात बुधवारी रात्री आठ वाजता होणाऱया प्राजक्ता माळी हिच्या शास्त्र्ााrय नृत्यसेवेला मंदिराच्या माजी विश्वस्त ललीता शिंदे यांनी विरोध केला, तसे पत्र केंद्रीय पुरातत्व विभागाला पाठवले. येथे गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडू नये, म्हणून ग्रामीण पोलिसांना पत्राद्वारे कळवले होते. केंद्रीय पुरातत्व विभागानेही असा विनापरवानगी कार्यक्रम घेणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचा आक्षेप पत्राद्वारे घेतला. त्यानंतर विश्वस्तांनी परवानगी मागणारे पत्र केंद्रीय पुरातत्व खात्याच्या महासंचालकांना पाठवले. मात्र, प्राजक्ता माळी यांनी बुधवारी एका व्हिडीओद्वारे आपण सादरीकरण करणार नाही, तर सहकाऱयांचे सादरीकरण होईल, असे स्पष्ट केले.