अतिक्रमणाविरोधात मध्य रेल्वेची धडक कारवाई; 165 अनधिकृत बांधकामे केली जमीनदोस्त

आपल्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्यासाठी मध्य रेल्वेने पंबर कसली आहे. मध्य रेल्वेने रविवारी हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते गुरू तेग बहादूर नगर रेल्वे परिसरातीत 165 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. ज्यामध्ये 140 छोटया दुकानांचा आणि 25 झोपडय़ांचा समावेश आहेत.

रेल्वे हद्दीतील जागेची देखभाल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मोठय़ा अनधिकृत बांधकामे तयार झाली आहेत. मात्र आता मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतीतील अतिक्रम हटविण्याचे काम सुरू केले आहे. शनिवारी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूर नगर, चुनाभट्टी, जुईनगर ते सानपाडा, घणसोली, रबाळे आणि बेलापूर स्थानकातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवले आहे. ज्यामध्ये जुईनगर ते सानपाडा यादरम्यानची 15 कच्ची बांधकाम हटवून कब्जा केलेली जमिनी पुन्हा रेल्वेच्या ताब्यात घेतली आहे. तर रविवारी गुरू तेग बहादूर नगर ते चुनाभट्टी दरम्यान अप मार्गावरील रेल्वे रुळालगत 165 अतिक्रमण हटविण्यात आली आहे. अतिक्रमण हटवताना अनुचित प्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.