अक्कलकोटजवळ अपघातात 6 भाविक ठार, 8 जखमी

अक्कलकोट येथे देवदर्शन करून गावाकडे परतणाऱया भाविकांच्या गाडीला शिरवळवाडी येथे आज सायंकाळी भीषण अपघात झाला असून, सहाजण जागीच ठार झाले, तर आठजण गंभीर जखमी झाले. भाविकांची क्रूझर व सिमेंट वाहतूक करणारा ट्रक यांची धडक होऊन हा अपघात झाला. या घटनेची अक्कलकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता मदन माने (रा. बेडगा, उमरगा), छाया हनूमान ननवरे (रा. इंदापूर, पुणे), ललिता महादेव बुग्गे, रोहिणी गोपाळ पुजारी, साईनाथ गोविंद पुजारी, सुंदराबाई भारतसिंग रजपूत (सर्व रा. अणूर, आळंद) अशी मृतांची नावे आहेत. तर चालक सुनील हणमंतराव पांचाळे, कोमल शांमडे, रेखा गोविंद पुजारी, गोपाळ चंद्रकांत पुजारी, विठ्ठल हणमंत ननवरे, अमित अशोक पुंदले, भाग्येश अशोक पुंदले, कल्पना अशोक पुंदले, अशोक पुंदले, सुनील पुजारी हे जखमी आहेत.