दिल्ली विधानभवन परिसरात पुन्हा राडा; ‘आप’च्या आमदारांना विधानभवनात नो एन्ट्री

दिल्ली विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात प्रंचंड गदारोळ झाला. विरोधी पक्ष आम आदमी पक्षाच्या आमदारांना दिल्ली विधानभवन परिसरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यानवरून भाजपच्या विरोधी पक्षनेत्या, आमदार आतिशी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपने सरकारमध्ये आल्यापासूनच हुकूमशाहीची सीमा ओलांडली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याचा ठपका ठेवत आपच्या 21 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र आता त्यांना विधानभवनाच्या परिसरात येण्यापासूनही रोखण्यात आले. यावरून आपच्या नेत्यांनी विधानभवनबाहेर भाजप सरकारविरोधात आंदोलन केले. ‘जय भीम’चा नारा दिल्याने आम आदमी पक्षाच्या आमदारांना सभागृहातून तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आणि आज ‘आप’च्या आमदारांना विधानभवनच्या आवारातही प्रवेश दिला जात नाही. भाजप सत्तेत आल्यापासूनच हुकूमशाही सुरू केली आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेत्या आणि ‘आप’च्या आमदार अतिशी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.

दिल्ली विधानसभेच्या इतिहासात या आधी असे कधीही घडले नाही. इथे निवडून आलेल्या आमदारांना विधानसभेच्या आवारात प्रवेश दिला जात नाहीए. तुम्ही सभागृहातून निलंबित करू शकता. मात्र विधानभवनच्या परिसरात येण्यापासून कसे रोखू शकता? यासंदर्भात यांच्याकडे कोणतीही लिखित न्यायालयीन आदेशही नाही, असे अतिशी यांनी सांगितले.

दिल्ली विधानसभेत राडा; आपचे सर्व आमदार निलंबित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगत सिंगांचा अवमान केल्यावरून गदारोळ