माजी मंत्री आणि आप नेते सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर, कोर्टात पत्नीला अश्रू अनावर

माजी मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉण्ड्रिंग संबधित प्रकरणात कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला तेव्हा त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले.

सत्येंद्र जैन खुप दिवस तुरुंगात होते आणि त्यांच्यावर अजून खटला सुरु झालेला नाही, असे म्हणत कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शींशी संपर्क न करणे आणि देशाबाहेर न जाण्याची अट कोर्टाने ठेवली आहे.

2022 साली सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली होती. गेल्या वर्षी आरोग्याच्या कारणास्तव जैन यांना जामीन मिळाला होता. 10 महिने ते जामिनावर बाहेर होते. मार्चमध्ये त्यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, पण कोर्टाने त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. तेव्हा 18 मार्चपासून जैन तुरुंगात होते.