पुणेकरांवर लादलेला रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प रद्द करा; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग करण्यात आल्याने पुण्यात 25 जुलैला पूर आला होता. अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. शिवसेना नेते आमदार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात एकतानगरमध्ये जाऊन पूरग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांच्या व्यथा ऐकल्या. यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर घणाघात केला.

महाविकास आघाडी सरकारने पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली होती. त्याच बरोबर दुरुस्तीही सुचवली होती. आमचं सरकार पाडल्यानंतर त्यानंतर आलेल्या घटनाबह्य सरकारने हा प्रकल्प राबवला. त्यांनी गुजरातच्या आर्किटेक्टला आणलं आणि पुण्यात पूरस्थिती उद्भवली. त्यामुळे सर्वप्रथम हा प्रकल्प रद्दच केला पाहिजे. हा प्रकल्प उर्मटपणाने पुणेकरांवर लादला जातोय. प्रतिष्ठीत नागरीक, अभियंते, अर्बन प्लॅनर्स, आर्किटेक्ट आणि पत्रकरांनीही या प्रकल्पावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या डोळ्यादेखत सर्व सुरू आहे. आणि तरीही हा प्रकल्प राबवला जात आहे. यामुळे त्याला आम्ही विरोध करणार. या घटनाबाह्य सरकारने अथवा राजवटीने तक्रारी ऐकून घ्यायला हव्या होत्या. आम्ही चर्चा केल्या, तुम्ही भेट तरी घ्या. आयुक्तींनी सर्वांचं ऐकून आणि भेटून समजून घेतलं पाहिजे. मग योग्य काय ते जनतेसमोर ठरवा, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

पुणे महापालिकेत हा प्रस्ताव मांडला गेला, तो पाहता कुणीही तो नाकारू शकलं नसंत. हा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट असल्याचं त्यात पहिले सांगण्यात आलं होतं. दुसरं म्हणजे आम्ही एकही झाड कापणार नाही. नदी अरुंद करू किंवा काँक्रीट भरू असं कुठेही त्यांनी प्रस्तावात म्हटलं नाही. पण पुढे त्याच्या बायलाइन वाचत जाल तर लक्षात येईल. राज्याच्या प्रमुख यंत्रणांकडून त्यांनी परवानगी मिळाली. त्यांनी यंत्रणांना फसवलं तर नगरसेवकांनाही फसवलं असेल. त्यामुळे या आर्किटेक्टवर हक्कभंग आणला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना!

मुंबई महापालिकेतील साडेसहा हजार कोटींचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला. पाच आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी कामं कशी दिली गेली आणि त्यांचे कसं बिडींग केलं, हे 15 जानेवारी 2023 ला पत्रकार परिषद घेऊन समोर मांडलं. त्यांनतर 18 जानेवारी 2023 ला पंतप्रधानांनी येऊन त्या कामांचं भूमिपूजनही केलं. त्या दिवसांपासून आतापर्यंत एक काम पूर्ण झालेलं दाखवावं? एक कॉन्ट्रॅक्टर त्यातून पळून गेला आहे. त्याला बाद केलं, ब्लॅक लिस्ट केलं, नाही केलं याची अजूनही कुठेही माहिती नाही. आणि आता पुन्हा एकदा साडेसहा हजार कोटीच्या कॉन्ट्रॅक्टची दुसरी कामं काढण्यात येत आहेत. ज्यांची गरज नाही. कारण 2021-2022 ची कामं पूर्ण झालेली नाहीत. 2022 ला टेंडर काढलं नाही. जे काढलं होतं ते रद्द केलं. कारण कॉन्ट्रॅक्टरने नकार दिला. 2023 ला काढलं त्याचं काम झालेलं नाही. आता जुलै उजाडलेला आहे. आणि पुन्हा साडेसहा हजार कोटीची नवीन कॉन्ट्रॅक्ट काढत आहेत. नवी पाच कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यातील एक ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे –

> नदीत टाकलेला राडारोडा काढून नदी रुंद करणं, खोल करणं गरजेचं आहे. नदीला श्वास घेऊ देणं गरजेचं आहे.

> महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटला स्थिगिती दिली होती. आमचा विकासाला विरोध नाही. पण प्रथम नदीची स्वच्छता पाहायला हवी